खासगी क्लासेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 07:32 PM2019-01-20T19:32:55+5:302019-01-20T19:39:24+5:30

जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसºयांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक  प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. त्यानंतर मुळे यांनी शहर संघटनेची कार्यकारी जाहीर केली असून, लवकरच जिल्हा कार्यकारिणीतील तालुकास्तरीय सदस्यांचीही घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Jayant Mulay gets third consecutive year as district president of private classes organization | खासगी क्लासेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड

खासगी क्लासेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड

Next
ठळक मुद्दे खासगी क्लासेस संचालक संघटनेची वार्षिक सभा वार्षिक बैठकीत जिल्हा कार्यकारणीची निवडजिल्हाध्यक्षपदी जयंत मुळे यांची यांची निवड

नाशिक : जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक  प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. त्यानंतर मुळे यांनी शहर संघटनेची कार्यकारी जाहीर केली असून, लवकरच जिल्हा कार्यकारिणीतील तालुकास्तरीय सदस्यांचीही घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
नाशिकमधील एका क्लासच्या इमारतीत रविवारी (दि. २०) झालेल्या जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्ष पदासाठी त्रैवार्षिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत गत दोन त्रैवार्षिक मध्ये बिनविरोध निवड झालेले प्रा. जयंत मुळे यांनीच विजय मिळवून सलग तिसºयांना अध्यक्षपद काबीज केले. सुमारे पाचशे मतदारांपैकी केवळ ८९ मतदारांनी सहभाग घेतलेल्या या निवडणुकीत प्रा. जयंत मुळे यांना ५८, तर त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांना ३१ मते मिळाली. निवडणूक प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित अध्यक्षांनी तत्काळ कार्यकारिणी जाहीर केली. यात राज्य प्रतिनिधी म्हणून यशवंत बोरसे व फैजल पटेल, उपाध्यक्षपदी अरुण कुशारे, मुकुंद रनाळकर, अण्णासाहेब नरु टे, शशिकांत तिडके, सचिवपदी लोकेश पारख, खजिनदार अतुल आचळे यांचा समावेश असून, कार्याध्यक्ष विजय डोशी यांच्यासह वाल्मीक सानप, पूनम कांडेकर, संजय कुलकर्णी, सहखजिनदार, संजय अभंग, सहकार्याध्यक्ष किशोर सपकाळे, नीलेश दुसे, सुभाष जाधव, धनंजय धाकणे आदींचाही या समितीत समावेश आहे, तर सिन्नर तालुक्यातून जयदेव जव्हेरी, निफाडमधून सागर सानप,  व कळवणमधून गिरीश येवला यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.  

शिकवणी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी
जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्य शासनाने शिकवणी नियमन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा ठराव करण्यात आला. तसेत इंटिग्रेटेड क्लासेस, बायोमेट्रिक हजेरी, शाळा महाविद्यालयांसारख्या शिक्षण संस्थांमध्ये नोकरीस असताना खासगी क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकांवर सरकारने कारवाई करावी, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात स्वतंत्र समिती स्थापण करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सद्यस्थितीत शिक्षण विभागातील विविध अधिकारी आणि संस्थाचालक शिक्षक यांचे संगनमत असल्याचा आरोपही यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत बोरसे यांनी केला आहे. 

Web Title: Jayant Mulay gets third consecutive year as district president of private classes organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.