जयंती महोत्सव : धर्मवीर संग्रहालयाचे उद््घाटन; विविध कार्यक्रम उत्साहात शानदार संचलनाने मुंजे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:18 AM2017-12-13T01:18:19+5:302017-12-13T01:19:02+5:30

उद्दिष्ट, स्वयंशिस्त आणि राष्ट्राभिमान ही तिन्ही सूत्रे अंगीकारल्यास आपण यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो, असे मत मुंबई येथील आयपीएस व्ही. व्ही. लक्ष्मण यांनी व्यक्त केले.

Jayanti Festival: inauguration of Dharmaveer Museum; Greetings to Munze with a wonderful circulation in various events | जयंती महोत्सव : धर्मवीर संग्रहालयाचे उद््घाटन; विविध कार्यक्रम उत्साहात शानदार संचलनाने मुंजे यांना अभिवादन

जयंती महोत्सव : धर्मवीर संग्रहालयाचे उद््घाटन; विविध कार्यक्रम उत्साहात शानदार संचलनाने मुंजे यांना अभिवादन

Next
ठळक मुद्देडॉ. मुंजे यांच्या समाधीस मानवंदना नानाविध वस्तूंचे संग्रहालय

नाशिक : उद्दिष्ट, स्वयंशिस्त आणि राष्ट्राभिमान ही तिन्ही सूत्रे अंगीकारल्यास आपण यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो, असे मत मुंबई येथील आयपीएस व्ही. व्ही. लक्ष्मण यांनी व्यक्त केले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक, स्वातंत्र्य सैनिक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांची १४५वी जयंती विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांच्या वतीने धर्मवीर डॉ. मुंजे यांच्या समाधीस मानवंदना देण्यात आली. प्रास्ताविक समादेशक (मेजर)चंद्रसेन कुलथे यांनी केले व संस्थेच्या कार्याचा आढावा सेंट्रल हिंदू मिलिटरी एजुकेशन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांनी घेतला. सूत्रसंचालन साहिल अतुल याने केले. या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जीवनपट भावचित्र, शस्त्र, दैनंदिन वापरातील पुरातन अशा नानाविध वस्तूंचे संग्रहालय तयार करण्यात आले असून, या धर्मवीर संग्रहालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलीप बेलगावकर, यांनी सांगितले की, भोसला सैनिकी संस्थेच्या स्थापनेसाठी डॉ. मुंजे यांनी अथक परिश्रम घेतले होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच देशसेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्थेच्या अभ्यासक्रमात संरक्षण विषय असावा असा त्यांचा प्रयत्न होता, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रशांत नाईक, राजाभाऊ गुजराथी, श्रीमती मंगला सवदीकर, नितीन गर्गे, नरेंद्र वाणी, नारायण दीक्षित, संजय सराफ, पराग कणेकर, प्रमोद धनगर, आशुतोष रहाळकर, शाळेचे समादेशक मेजर (नि.) चंद्रसेन कुलथे, प्राचार्य, श्रीमती चेतना गौड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Jayanti Festival: inauguration of Dharmaveer Museum; Greetings to Munze with a wonderful circulation in various events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर