लासलगावच्या सरपंचपदी जयदत्त होळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:19 AM2021-02-26T04:19:54+5:302021-02-26T04:19:54+5:30
लासलगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामविकास पॅनलचे जयदत्त सीताराम होळकर, तर उपसरपंचपदी ...
लासलगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामविकास पॅनलचे जयदत्त सीताराम होळकर, तर उपसरपंचपदी अफजल शेख निवडून आले. विरोधी गटाचे सरपंचपदाचे उमेदवार रोहित बाळासाहेब पाटील, तर उपसरपंचपदाकरिता ज्योती गणेश निकम यांना पराभव पत्कारावा लागला.
निवडणूक निर्णय अधिकारी महेश नागपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदाकरिता जयदत्त सीताराम होळकर, सायली संजय पाटील व रोहित बाळासाहेब पाटील या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी, तर उपसरपंच पदाकरिता अफजल नसीर शेख व सौ.ज्योती गणेश निकम यांनी दोन उमेदवारी अर्ज नेले होते. यापैकी सरपंचपदाकरिता डाॅ. सायली संजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सरपंचदा व उपसरपंचपदाकरिता प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने अमोल थोरे यांनी मतदान घेण्याची मागणी केली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी महेश नागपूरकर यांनी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यांना लासलगावचे तलाठी नितीन केदार व लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी साहाय्य केले. यावेळी जयदत्त होळकर व अफझल शेख यांना १७ पैकी दहा मते मिळून ते विजयी घोषित करण्यात आले.
इन्फो
होळकर गटाचे बहुमत
निफाड तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या लासलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जयदत्त होळकर व नानासाहेब पाटील गटाच्या ग्रामविकास पॅनलचे १७ पैकी १० सदस्य निवडून आले होते, तर माजी आमदार कल्याणराव पाटील, डी. के. जगताप, प्रकाश दायमा यांच्या परिवर्तन शहर विकास पॅनलचे सात सदस्य विजयी झाले होते.
फोटो- २५ लासलगाव सरपंच
लासलगावच्या सरपंचपदी जयदत्त होळकर व उपसरपंचपदी अफझल शेख विजयी झाल्यानंतर जल्लोष करताना समर्थक.
===Photopath===
250221\25nsk_34_25022021_13.jpg
===Caption===
फोटो- २५ लासलगाव सरपंच लासलगावच्या सरपंचपदी जयदत्त होळकर व उपसरपंचपदी अफझल शेख विजयी झाल्यानंतर जल्लोष करताना समर्थक.