जयदर : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी, महावितरण अधिकाºयांना निवेदन आदिवासी शेतकºयांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:18 AM2018-02-09T00:18:46+5:302018-02-09T00:19:20+5:30
कळवण : कनाशी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द दिल्यानंतर आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला.
कळवण : कनाशी येथील १३२ केव्ही केंद्रासह पिंपळे येथील प्रस्तावित वीज उपकेंद्र, जयदर येथे पाच एमव्हीएच्या रोहित्रासह जयदर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द महावितरणच्या यंत्रणेने दिल्यानंतर जयदर परिसरातील वीज समस्या संदर्भातील बैठकीत आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला. जयदर परिसरातील आदिवासी गावे, खेडी, पाडे व वस्त्यांवरील वीजपुरवठा सुरळीत नाही. विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असून, जयदर परिसरातील वीज समस्यांबाबत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता टेंभुर्णे, उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सदस्य लाला जाधव, अर्जुन बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. जयदर परिसरात पाणी असूनही विजेअभावी पिकांना देता येत नसल्याने आदिवासी शेतकरीबांधवांनी आक्रमक भूमिका घेऊन या समस्येसंदर्भात बैठकीत तासभर ठिय्या मांडला व विजेच्या समस्या यंत्रणेसमोर कथन केल्या. शेतीला लागणारे पाणी विजेवर अवलंबून आहे. वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने व सततच्या होणाºया भारनियमनामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वीज ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेत न मिळता केव्हाही येते आणि केव्हाही जाते. त्यामुळे जयदर परिसरातील शेती व्यवसायाचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. शेतीला पुरेसे पाणी विजेअभावी देता येत नाही. मात्र वीज वितरण कंपनी शेतकºयांकडून १०० टक्के वीजबिल वसुली करते. मात्र वीजपुरवठा सुरळीत करत नसल्याने जयदर परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीस रामदास चव्हाण, मन्साराम गायकवाड, अर्जुन बागुल, तुळशीराम चौधरी, पंडित गांगुर्डे, हिरामण पालवी, आनंदा पालवी, पोपट गायकवाड, पांडुरंग गायकवाड, रामा पवार, गुलाब चौधरी, रतन बर्डे, पप्पू चव्हाण, उत्तम भोये, धवळू चौरे, भावडू बर्डे, कृष्णा बर्डे, हिरामण पवार, शिवाजी पवार, पांडुरंग देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रघू महाजन यांनी केले.