जयेश पगार मित्रमंडळाचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 11:19 PM2020-04-04T23:19:34+5:302020-04-04T23:20:02+5:30

कळवण : लॉकडाउनमुळे कळवण शहरात अडकून पडलेल्या १०० मजुर कुटुंबाना संभाजीनगर येथील नगरसेवक जयेश पगार मित्रमंडळाकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. आमदार नितीन पवार यांच्या हस्ते १०० कुटुंबाना धान्य, किराणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Jayesh Salary Friend Helping Hands | जयेश पगार मित्रमंडळाचा मदतीचा हात

जयेश पगार मित्रमंडळाचा मदतीचा हात

Next
ठळक मुद्दे मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ


कळवण येथे जयेश पगार मित्रमंडळाकडून मजूर कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार नितीन पवार, जयेश पगार, भूषण पगार, सागर पगार, सुनील मोहिते आदी,

 

कळवण : लॉकडाउनमुळे कळवण शहरात अडकून पडलेल्या १०० मजुर कुटुंबाना संभाजीनगर येथील नगरसेवक जयेश पगार मित्रमंडळाकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. आमदार नितीन पवार यांच्या हस्ते १०० कुटुंबाना धान्य, किराणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आल्याने रोजंदारीने काम करून उपजीविका भागवणाऱ्या मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
४कळवण शहरात या शेकडो परप्रांतीय मजुरांना ठिकठिकाणी राहण्याची व्यवस्था कळवण नगरपंचायतने केली आहे. मजुरांना प्रत्येकी आटा, तूर डाळ, मीठ, गूळ, तांदूळ, तेल व साबण असे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक जयेश पगार, कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, उपनगराध्यक्ष अतुल पगार, अविनाश पगार,मनोज पगार, सागर पगार,रवि मोहिते, सुनील मोहिते, नितीन पगार, राकेश पगार आदी उपस्थित होते.

Web Title: Jayesh Salary Friend Helping Hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.