तेल्या, मर रोगाला कंटाळून जेसीबीने तोडली डाळिंब बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 02:12 PM2021-01-29T14:12:49+5:302021-01-29T14:12:57+5:30
ब्राह्मणगाव : वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे डाळिंब बागेवर् तेल्या ,मर रोगाने आघात केल्याने तसेच गेल्या चार पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, व अन्य नैसर्गिक संकटांना शेतकरी वर्ग कंटाळला असून सतत च्या या आपत्तींना कंटाळून येथील डाळिंब उत्पादक रमेश अमृत अहिरे यांनी आडीच एकर डाळिंब बाग जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकली.

गेल्या चार पाच वर्षांपासून शेती व्यवसायावर नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना सारखे तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोस त शेती व्यवसाय करत आहे. मात्र सद्या अचानक येणारे ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, , अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना उत्पंनपेक्षा मिळणारा भाव, यात होणारे सर्व नुकसान याला कंटाळून येथे डाळिंब उत्पादक रमेश अमृत अहिरे यांनी डाळिंब बाग जेसीबीच्या सहाय्याने तर आठ दहा दिवसापूर्वी योगेश अरुण अहिरे, चंद्रकांत गोविंद अहिरे यांनी द्राक्ष बाग कुऱ्हाडीने तोडून टाकल्या . सद्यातर सर्वच पिकांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. कांदा पिकावर अनेक रोग अतिक्रमण करत आहेत. गव्हाचे क्षेत्र पूर्णपणे घटले असून कांदा पिकावर शेतकऱ्यांच्या आर्थिक अपेक्षा आहे. सततच्या या नैसर्गिक संकटांना तोंड देत असलो तरी नेमके कोणते पीक घ्यावे या विवंचनेत शेतकरी आहेत.