१ ते ६ सप्टेंबरदरम्यान जेईई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:30 PM2020-08-22T22:30:50+5:302020-08-23T00:24:43+5:30

नाशिक : कोरोना संक्रमण काळात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील ८ लाख ५८ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांनी कोरोनासंबंधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन एनटीएने केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील एनआयटी/आयआयटीसारख्या तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी देशभरातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.

JEE from 1st to 6th September | १ ते ६ सप्टेंबरदरम्यान जेईई

१ ते ६ सप्टेंबरदरम्यान जेईई

Next
ठळक मुद्देतंत्रशिक्षण प्रवेशाची कसोटी । देशभरातून साडेआठ लाख विद्यार्थी होणार प्रविष्ठ

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना संक्रमण काळात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी देशभरातील ८ लाख ५८ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांनी कोरोनासंबंधी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन एनटीएने केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील एनआयटी/आयआयटीसारख्या तंत्रशिक्षण व अभियांत्रिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी देशभरातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.
एनटीएकडून जेईई मेन २०२०चे आयोजन संगणक आधारित पद्धतीने (सीबीटी मोड)होणार आहे. बीटेक/ बीई आणि बीआर्कसाठी दोन वेगवेगळ्या परीक्षा होणार असून, बीटेक / बीईसाठी देशभरात ६०५ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. बीआर्क व बीप्लॅनिंगसाठी देशातील विविध शहरांमध्ये ४८९ परीक्षा केंद्रे आहेत. भारतात एकूण २२४ शहरांमध्ये आणि परदेशातील आठ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी दोन परीक्षार्थींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवले जाणार असून, परीक्षामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही यासाठी विशेष उपाय करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा सभागृहात हात स्वच्छ तसेच निर्जंतुक केल्यावरच प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचे प्रत्येक सत्र सुरू होण्यापूर्वी तसेच संपल्यानंतर विद्यार्थ्यांची जागा पूर्ण निर्जंतुक करण्यात येईल. त्यात वर्क स्टेशन, कीबोर्ड, बसण्याची जागा याचाही समवेश असून, हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर परीक्षा केंद्रात तसेच परीक्षा होणाºया हॉलमध्ये उपलब्ध असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मास्क परिधान केला असेल तरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश असेल, त्याचबरोबर त्यांना सॅनिटायझरही घेऊन यावे लागणार आहे.

Web Title: JEE from 1st to 6th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.