जेईई मेन्स परीक्षेला आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 01:40 AM2020-09-01T01:40:36+5:302020-09-01T01:41:27+5:30
नाशिक : जेईई मेन्स परीक्षेला मंगळवारपासून (दि.१) सुरुवात होत असून, शहरातील पाच केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. येत्या ६ ...
नाशिक : जेईई मेन्स परीक्षेला मंगळवारपासून (दि.१) सुरुवात होत असून, शहरातील पाच केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. येत्या ६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेस सोळाशे विद्यार्थी प्रविष्ट आहेत.
शहरातील वडाळा रोडवरील आयआॅन डिजिटल, वेबथी इन्फोटेक, फ्यूचर टेकसोल्युशन्स, नाशिक टेस्टिंंग एजन्सी आणि पीएसकेएस अशा पाच केंद्रांवर ही परीक्षा होत असताना सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या एकुण क्षमतेच्या तुलनेत निम्या जागांवरच विद्यार्थी परीक्षा देतील.
म्हणजेच सुरक्षित आंतराचे पालन करण्यात येणार असून मास्क, हँडसॅनिटायझर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या सुरुवातीला परीक्षा केंद्रांवर येणाीया विद्यार्थ्यांची तापमोजणी करण्यात येणार आहे.