वणी-दिंडोरी रस्त्यावर जीप उलटली; १८ भाविक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:23 AM2017-09-21T00:23:30+5:302017-09-21T00:23:35+5:30
वणी : सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी व मशालज्योत प्रज्वलित करण्यासाठी पिकअप जीपमधून जाणाºया भाविकांच्या वाहनाला हॉटेल श्रीहरी परिसरात अपघात झाला असून, खड्ड्यात पिकअप जीपचे चाक आदळल्यानंतर स्टेअरिंग लॉक झाल्याने पिकअप पलटी होऊन १८ भाविक जखमी झाले असून, दोन अत्यवस्थांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यातील सुमारे २५ भाविक सप्तशृंगगडावर येण्यासाठी निघाले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास वणी-दिंडोरी रस्त्यावरील ओझरखेड परिसरातील हॉटेलजवळ सदर पिकअप जीप क्र. एमएच १५ एजी ७९८७ आली असताना जीपचे चाक खड्ड्यात आदळले व त्याच सुमारास स्टेअरिंग लॉक झाले व चालकाने ब्रेक मारला असता सदर वाहन पलटी झाले. वाहनामधील भाविकांच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच डॉं. प्रकाश देशमुख, प्रशांत चव्हाण यांनी घटनास्थळावर जाऊन जखमींना वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. टॅक्सीचालक-मालक संघटनेचे नाना जाधव व कार्यकर्त्यांनी याकामी त्यांना मदत केली. जखमींची नावे अशी : मंगला सीताराम मेंगाळ (५०), लक्ष्मी रामदास मेंगाळ (३०), एकनाथ काळू खेतेले चालक (३०), तारा लक्ष्मण खेतेले (२६), सविता दिनकर मेंगाळ (२०), काळूबाई पंढरी साबळे (३५), संगीता पंढरी साबळे (१७), अक्षय रमेश जगताप (२०),अनिता बबन तळपाडे (१७), अश्विनी रामदास तळपाडे (१८), प्रकाश नामदेव जाधव (१४), भारती निवृत्ती तळपाडे (२१), सुनंदा बाळू मेंगाळ (१९), गोरख तुकाराम उघडे (२३), बाळू रामचंद्र खोडके (१६), लक्ष्मीबाई रामचंद्र खोडके (४५) सर्व राहणार केळीरूम वनवाडी, संगमनेर, ता. अकोले मच्ंिछद्र तुळशीराम लोखंडे राहणार शेलविहीर (१७), जुबराबाई बाळू कवटे (२४) रा. कावनई पैकी चालक खेतले व लोखंडे यांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.