झेंडूच्या फुलांनी भरलेली जीप पलटून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 06:43 PM2018-08-08T18:43:32+5:302018-08-08T18:43:59+5:30
सुरगाणा : येथून सात किलोमीटर अंतरावर लहान भोरमाळ जवळील कमकुवत फरशी पूलावरु न जाणारी झेंडूच्या फुलांनी भरलेली पीक अप जीप पलटून अपघात घडला.
सुरगाणा :
येथून सात किलोमीटर अंतरावर लहान भोरमाळ जवळील कमकुवत फरशी पूलावरु न जाणारी झेंडूच्या फुलांनी भरलेली पीक अप जीप पलटून अपघात घडला.
करोडो रु पये खर्च करून गुजरात राज्याला जोडणारा बोरगाव ते बर्डीपाडा हा महामार्ग करण्यात आला. महामार्ग चांगला आहे. मात्र या मार्गावर काही जूने पूल असून त्यापैकी लहान भोरमाळ जवळील जूना फरशी पूल धोकादायक बनला आहे. गेल्या आठवड्यात पूरामुळे या पूलावर भगदाड पडले होते. हा खड्डा बुजविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली होती. मात्र संरक्षक कठडे संरक्षित नाहीत. वळणावरच हा फरशी पूल असल्याने काही वाहन चालकांना ते लक्षात येत नाही. गुजरातकडे झेंडूची फुले घेऊन जाणारी एम एच १५ ई जी ४८०६ या फरशी पूलावरु न पाण्यात पलटली.
अपघाला निमंत्रण देणाऱ्या या फरशी पूलाची तातडीने दुरु स्ती करून या महामार्गावरील सर्व जून्या पूलांची नव्याने बांधणी करावी अशी मागणी खुंटविहिर येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा झिरवाळ, रामा गावीत, नवसू गायकवाड, रामदास केंगा आदींसह भोरमाळ ग्रामस्थांनी केली आहे.