रु ई येथील जिप शाळा मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 08:09 PM2019-06-22T20:09:15+5:302019-06-22T20:09:26+5:30
खेडलेझुंगे : रु ई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुमारे २६९ विद्यार्थी जीव धोक्यात घालुन शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या सुमारे आठ खोल्यांची ईमारत ही जुनी असल्याने पुर्णपणे जिर्ण झालेली असुन ती कोणत्याही क्षणी कोसळुन अनर्थ घडु शकतो.
खेडलेझुंगे : रु ई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुमारे २६९ विद्यार्थी जीव धोक्यात घालुन शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या सुमारे आठ खोल्यांची ईमारत ही जुनी असल्याने पुर्णपणे जिर्ण झालेली असुन ती कोणत्याही क्षणी कोसळुन अनर्थ घडु शकतो.
सदरच्या शाळेच्या ईमारत निर्लेखन करण्यासाठीचा प्रस्ताव शाळेकडुन मागील २ वर्षापुर्वीच सादर करण्यात आलेला असुनही वरिष्ठ कार्यालयाकडुन अद्याप पावेतो सदरच्या शाळेच्या ईमारतीच्या निर्लेखनाचे आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. जिर्ण झालेली ईमारत ही कौलारु असुन ती कोणत्याही क्षणी कोसळुन अनर्थ घडु शकतो. याबाबत शाळेकडुन ईमारत उतरविणे कामाचा प्रस्ताव सादर करुन वेळोवेळी पाठपुरावा करुनही वरिष्ठ स्तरावरुन त्याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.
सदर शाळेच्या ईमारतीच्या भिंतीला तडे गेलेले आहेत. भिंतीचे दगड पडलेले आहेत. कौल फुटलेले आहेत. सरई चिरलेल्या आहेत. आणि भिंतीला मोठमोठे भोके पडलेले असल्याने तेथे सर्प, विंचु सारखे विषारी श्वापद दिसुन येतात.
मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये शाळांचे वर्ग भरवून बालकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न होत आहे. जि.प. शाळेच्या इमारतींमध्ये शालेय मुले जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळेकडे पालक वर्ग विद्यार्थांना या वर्षापासुन पाठवतील की नाही हा प्रश्न शिक्षकांपुढे उभा राहीलेला आहे. त्यामुळे जिर्ण ईमारती पाडण्याच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी मिळणे गरजेचे आहे.
दोन वर्षापासुन कुजलेले वासे, मोडकळीस आलेले छप्पर, तुटलेल्या भिंती या अवस्थेत असलेल्या शाळेच्या ईमारतीच्यÞा निर्लेखनाचा प्रस्ताव देवुनही प्रशासनाने या सार्याला वाटाण्याचा अक्षता लावल्या आहेत. धोकादायक इमारतीमुळे यÞा वर्षी शाळा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ईमारती किंवा मंदिरात भरवाव्यात की काय असा प्रश्न शिक्षक आणि पालक वर्गापुढे आहे. शाळेचे छप्पर पूर्णत: कुजले असून, वासे कधी कोसळून पडतील हे सांगता येत नाही. सदरच्या प्रस्तवास तात्काळ मंजुरी मिळावी अशी अपेक्षा पालक वर्ग करत आहे.