शिवशाहीबसच्या घडकेने जीप उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:56 PM2018-12-08T17:56:11+5:302018-12-08T17:56:47+5:30

चांदोरी : येथील सुकेणे फाटा तेथे शनिवारी दुपारी औरंगाबाद डेपो ची औरंगाबाद - नाशिक या शिवशाही बस यांच्या मध्ये जबरदस्त अपघात झाला. यामध्ये पिकअप २०७ च्या चालकासह अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहे.

The jeep was broken by a piece of Shivshahi bus | शिवशाहीबसच्या घडकेने जीप उलटली

शिवशाहीबसच्या घडकेने जीप उलटली

Next
ठळक मुद्देचांदोरी : तीन जखमी; बस चालक-वाहक फरार

चांदोरी : येथील सुकेणे फाटा तेथे शनिवारी दुपारी औरंगाबाद डेपो ची औरंगाबाद - नाशिक या शिवशाही बस यांच्या मध्ये जबरदस्त अपघात झाला. यामध्ये पिकअप २०७ च्या चालकासह अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहे.
शनिवारी (दि.८) दुपारी सुमारे १.१५ च्या दरम्यान टाटा पिकअप २०७ (एम.एच. १६ क्यू. ४२८०) निफाडकडून नाशिककडे जात होती व त्याच्या पाठोपाठ शिवशाही बस (एम.एच. ०६ बी.डब्लू. ०५१७) सुध्दा औरंगाबादकडून नाशिककडे प्रवास करत असताना शिवशाही बस वेगाने असल्याने पिकअप २०७ ला मागून जबरदस्त धडक बसली. ही धडक जोरात असल्याने पिकअप रस्त्या जवळलील नालीमध्ये पलटली त्यात श्रीराम सिटी फायनान्सच्या दुचाकी होत्या आणि शिवशाही बस वेगात असल्याने बस रस्त्यामधील असलेल्या दुभाजक ओलांडून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये शिरली. बसमध्ये केवळ चार प्रवाशी होते.
सुदैवाने जीवितहानी झाली नसून त्यांना स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. अपघातानंतर बस चालक व वाहक फरार झाले.
या अपघातात टाटा पिकअप २०७ मधील रावसाहेब टर्ले, किरण मोगल, किरण चव्हाण हे जखमी झाले आहे. त्यांना स्थानिक रहिवासी व चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कर्मचाºयांनी चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
या अपघाताची अधिक चौकशी सायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
बसचा वेग जास्त असल्याने आम्हाला बस दुभाजक ओलांडून कशी आली अन् कधी हे सुध्दा समजले नाही असे बस मधील प्रवाश्यानी सांगितले.
(फोटो ०८ चांदोरी फोटो, ०८ चांदोरी फोटो १)





 

Web Title: The jeep was broken by a piece of Shivshahi bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात