सोनगाव येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:04 PM2019-04-28T13:04:06+5:302019-04-28T13:04:18+5:30
सायखेडा : सोनगाव (ता. निफाड) येथील शेतकरी अशोक पिराजी जाधव यांच्या गट न १०६७ मधील विहिरीत रविवारी पहाटे पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले.
सायखेडा : सोनगाव (ता. निफाड) येथील शेतकरी अशोक पिराजी जाधव यांच्या गट न १०६७ मधील विहिरीत रविवारी पहाटे पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले. बिबटया नर असून अंदाजे दीड वर्ष वयाचे असल्याची माहिती वन विभागाचे अधिकारी संजय भंडारी यांनी सांगितले. जाधव पहाटे साडेसहाच्या सुमारास विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता विहिरीतून आवाज आल्यावर डोकावून पाहिले असता त्यांना बिबटया डरकाळ्या फोडतांना दिसला. चवताळलेला बिबटया मोटरला बाधलेल्या दोरी ,पाईप यांच्यावर धाव घेऊन किंचाळत होता. यावेळी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली, वनसेवक व्ही आर टेकनर, वनरक्षक भैय्या शेख,आर एल भोरकडे , रोजंदारी मजुर, आदिच्या मदतीने सकाळी आठ वाजेच्या सुमारास
क्र ेनच्या सहाय्याने बिबट्या बाहेर काढण्यात आला.