नागरिकांची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:44 PM2020-02-07T22:44:02+5:302020-02-08T00:03:34+5:30

आडगाव (भू) गावातील अनेक वर्षांपासून उभे असलेले विद्युतखांब जीर्ण झाले आहेत. गंजलेले खांब व लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जीर्ण खांब व वीजवाहिन्या बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी पेठचे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Jeopardizing the safety of citizens | नागरिकांची सुरक्षा धोक्यात

नागरिकांची सुरक्षा धोक्यात

Next


आडगाव (भू) येथील जीर्ण झालेला विद्युतखांब.

पेठ : तालुक्यातील आडगाव (भू) गावातील अनेक वर्षांपासून उभे असलेले विद्युतखांब जीर्ण झाले आहेत. गंजलेले खांब व लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जीर्ण खांब व वीजवाहिन्या बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी पेठचे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गावात बहुतांश नागरिकांनी जुनी घरे पाडून नवीन घरांची बांधणी केल्याने घरांवरून गेलेल्या धोकादायक वीजवाहिन्यांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच जीर्ण खांब कोसळण्याची भीती आहे, या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तुकाराम भोये, विजय गायकवाड, सदू धुळे, नेताजी गावित यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Jeopardizing the safety of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.