रेल्वेतून ४३ लाखांच्या रोकडसह दागिने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:40 AM2019-03-24T00:40:28+5:302019-03-24T00:40:44+5:30
नागपूर, अकोला या शहरांमधील सराफी व्यावसायिकांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून ४३ लाख ७६ हजार ५०० रुपयांची रोकड व साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने विनापरवाना बेकायदेशीरपणे सोबत बाळगून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला.
नाशिकरोड : नागपूर, अकोला या शहरांमधील सराफी व्यावसायिकांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून ४३ लाख ७६ हजार ५०० रुपयांची रोकड व साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने विनापरवाना बेकायदेशीरपणे सोबत बाळगून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. रेल्वे गस्त पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरवून पोलीस ठाण्यात चौकशी करत झाडाझडती घेत सुमारे ५१ लाख रुपयांचा ऐवज जप्त के ला. दोघा संशयित व्यावसायिकांना आयकर विभागाच्या हवाली करण्यात आले आहे. गोंदियावरून निघालेल्या विदर्भ एक्स्प्रेसमधून नागपूर, अकोला येथून दोन सराफी व्यावसायिक मुंबईला जाण्यासाठी आरक्षित बोगीमध्ये बसले.
दोघांची केली कसून चौकशी
रेल्वे पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता बमनेल याच्या बॅगेतून ४३ लाख ७६ हजार ५०० रुपयांची रोकड, १ लाख २८ हजार ८९६ रुपयांचे सोने आढळून आले. हा माल अमरावतीमधील व्यापारी रतनलालजी घनश्याम यांच्याकडून बमनेल घेऊन मुंबईतील कळवादेवी येथे पोहच करणार होता. तसेच अकोला येथील व्यापारी प्रशांत शाह यांच्याकडील कुरियर सवर््िहसचे ज्वेलरी पार्सल पंचारिया हा मुंबईच्या जैन नावाच्या कारागिराजवळ दागिने घेऊन जात होता. त्याच्या बॅगेत ६ लाख ३२ हजार ५५० रुपये किमतीचे २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने सापडले.