मीटर रिडिंगच्या बहाण्याने दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:14 AM2018-02-17T02:14:21+5:302018-02-17T02:14:38+5:30

वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडिंगच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयितांनी पेठ फाटा परिसरातील एका वृद्धेच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास भक्तिधामजवळ घडली़

 Jewelry theft by sowing meter readings | मीटर रिडिंगच्या बहाण्याने दागिन्यांची चोरी

मीटर रिडिंगच्या बहाण्याने दागिन्यांची चोरी

Next

पंचवटी : वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडिंगच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयितांनी पेठ फाटा परिसरातील एका वृद्धेच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास भक्तिधामजवळ घडली़  तुलसी श्याम अपार्टमेंट येथील रहिवासी जयश्री दिलीप जोशी (६०) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार जोशी या पती, मुलगा, सून व नातू यांच्यासह राहतात. मुलगा व सून हे दोघेही कामावर गेलेले असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दरवाजाची बेल वाजल्याने जोशी यांनी दरवाजा उघडला़ दरवाजासमोर उभ्या असलेल्या दोघा संशयितांनी आम्ही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून मीटरचे रिडिंग घेण्यासाठी आलो आहेत, असे सांगितले़ तसेच  दरवाजा उघडण्यास वेळ का लावला असे विचारताच जोशी यांनी गुडघे दुखत असल्याचे सांगितले.  यानंतर जोशी यांनी मुलाला फोन लावून दिल्यानंतर यापैकी एका संशयिताने बोलल्यानंतर फोन कट केला.  या दोन संशयितांनी आम्ही गुडघा चोळून देण्याचेही काम करतो असे सांगून दिलीप जोशी यांना वडाची पाने आणण्यास सांगितले़ मात्र त्यांनी नकार देताच जोशी यांना तूळस व उंबराची पाने आणायला सांगून घरात किती लाइटचे किती पॉर्इंट आहे ते दाखवा म्हणत दुसºयाने अंगावरील दागिन्यांमुळे मंत्राचा उपयोग होत नसल्याने सोने काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार जोशी यांनी दागिने स्वयंपाक खोलीतील एका स्टिलच्या डब्यात ठेवले़ यानंतर संशयितांनी जोशी यांना डोळे मिटून पलंगावर पडून राहा तोपर्यंत आम्ही मीटर रिडिंग घेतो, असे सांगून दागिने घेऊन पसार झाले़  दरम्यान, बराचवेळ होऊनही दोघेही संशयित न आल्याने जोशी यांनी दागिने ठेवलेला डब्याची तपासणी केली असता दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले़ त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयितांविरोधात फिर्याद दिली़

Web Title:  Jewelry theft by sowing meter readings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा