कोरोना चाचणीसाठी सातपूर कॉलनीत झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:13 AM2021-04-10T04:13:50+5:302021-04-10T04:13:50+5:30
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दवाखान्यात कोणत्याही औषधोपचारासाठी असो की, शस्त्रक्रिया असो लस घ्यायची असो प्रत्येकाला ॲंटिजेन ...
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दवाखान्यात कोणत्याही औषधोपचारासाठी असो की, शस्त्रक्रिया असो लस घ्यायची असो प्रत्येकाला ॲंटिजेन चाचणी करून आणण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. प्रवासाला जायचे असेल तरी ॲंटिजेन चाचणी सक्तीची असल्याने ही चाचणी करण्यासाठी झुंबड उडत आहे. सातपूर कॉलनीतील महानगरपालिकेच्या दवाखान्यात सातपूरकरांसाठी मोफत ॲंटिजेन चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सातपूर कॉलनीतील श्री सप्तश्रृंगी देवी मंदिरासमोरील सार्वजनिक वाचनालयात ही सोय करण्यात आली असून, सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत ही चाचणी केली जाते. साधारणपणे १५० ते २०० लोकांच्या अँटिजेन चाचण्या केल्या जात असल्याचे समजते. चाचणी करण्यासाठी सकाळपासून सर्व वयोगटातील महिला व पुरुष रांगेत उभे असतात. रांगेत उभे राहताना कोणतेही नियम पाळले जात नाहीत. ज्यांना कोरोना झाला असेल तेही रांगेत उभे राहत असल्याने अन्य लोकांना लागण होण्याची दाट शक्यता आहे. केंद्राबाहेर रांगेत उभे राहणाऱ्यांसाठी कोणतेही नियोजन नाही. कडकडीत उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे.
(फोटो ०९ सातपुर) सातपूर कॉलनीतील महानगरपालिकेच्या दवाखान्यात सुरू असलेल्या ॲंटिजेन कोरोना चाचणी करणाऱ्यांची भली मोठी रांग.