‘जिजामाता’च्या सायली अहिरेची राष्ट्रीय तर निकिता बच्छावची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:39 PM2018-12-01T22:39:57+5:302018-12-01T22:40:39+5:30
सटाणा : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सायली कारभारी अहिरे या विद्यार्थिनीची मोहाली (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तर निकिता केदा बच्छाव हिची बारामती (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेतर्फेशनिवारी (दि. १) उपसभापती राघो अहिरे, तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे व शालेय समिती अध्यक्ष उत्तरा सोनवणे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव केला.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडिया, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशन आणि राज्य शासनाच्या क्र ीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती (चंद्रपूर) येथे बॉक्ंिसगची राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. सायली अहिरेची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. अंतिम सामन्यात सायलीने मुंबईच्या स्पर्धकाला चारीमुंड्या चीत करून विजय मिळविला. या विजयामुळे मोहाली येथे होणाºया राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अंतिम सामन्यात निकिताने उत्कृष्ट खेळ करीत विजय मिळविला. त्यामुळे तिची बारामती (पुणे) येथे होणाºया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक प्रा. डी. एम. राठोड, एस.एन. सोनवणे, एस. डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयात आयोजित विशेष कार्यक्र मात आज संस्थेचे उपसभापती राघो अहिरे, तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे व शालेय समिती अध्यक्ष उत्तरा सोनवणे यांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य सुलभा मराठे, उपप्राचार्य एस. जी. भामरे, उपमुख्याध्यापक बी.ए. निकम, पर्यवेक्षक एस.जे. देवरे, बी.बी. सावकार, एम.बी. सोनवणे, बी.जे. पवार, डी. बी. सोनवणे, बी.डी. पाटील, आर.एस. देवरे, योगेश चव्हाण आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.धारावी (मुंबई) येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी कल्याणी यशवंते, मंजूषा शेवाळे व प्रिया जाधव या तीन विद्यार्थिनींची निवड झाली होती. स्पर्धेत मंजूषा शेवाळे हिने उत्कृष्ट खेळ करीत तृतीय स्थान मिळविले. तसेच नाशिक येथील विभागीय क्र ीडा संकुलात झालेल्या विभागीय क्र ीडा स्पर्धेसाठी शाळेच्या निकिता बच्छाव व शांती चव्हाण यांची निवड झाली होती.