जिजाऊनगर, आनंद, प्रेरणा कॉलनी समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:34 PM2020-01-09T23:34:48+5:302020-01-09T23:35:44+5:30

सोयगाव, चर्चगेट व नामपूर रस्त्यालगत असलेल्या आनंद सोसायटी, प्रेरणा कॉलनी, जिजाऊ नगर, शाकांभरी कॉलनी परिसरातील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त झाले आहेत. सध्या हा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

Jijaunagar, Anand, Inspired by Colony Problems | जिजाऊनगर, आनंद, प्रेरणा कॉलनी समस्यांच्या विळख्यात

चर्च गेट ते नामपूर रस्त्यालगतच्या कॉलन्यांमधील मोकळ्या भूखंडांवर वाढलेले गवत व काटेरी झुडपे.

Next
ठळक मुद्देमालेगाव : आरोग्य, रस्ते, पाण्याची समस्या कायम; मोकळ्या भूखंडांवर काटेरी झुडपे

मालेगाव : शहरातील हद्दवाढ भागातील सोयगाव, चर्चगेट व नामपूर रस्त्यालगत असलेल्या आनंद सोसायटी, प्रेरणा कॉलनी, जिजाऊ नगर, शाकांभरी कॉलनी परिसरातील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त झाले आहेत. सध्या हा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.
हद्दवाढीनंतर या भागाचा मोठा भाग विस्तार झाला आहे. मात्र अनंत अडचणी असल्याने नागरिक महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करतात. रस्ते असले तरी खडी उखडल्याने ये-जा, वाहनधारकांची तारांबळ उडते. पावसाळ्यात तर चिखलाचे साम्राज्य असते. परिसरातील काळी माती पायपीट करावी लागते. पाणी पोहचले असले तरी उन्हाळ्यात तीन-चार दिवसाआड पाणी गृहिणींची ओढाताण करणारे आहे.
गटारी नसल्याने स्वच्छता नाही
घंटागाडी कॉलनीत अंतर्गत येतच नाही. कचऱ्यासाठी मोकळ्या भूखंडाचा आधार घेतात. या भागात मोठ्या प्रमाणावर मोकळे भूखंड असल्याने आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. किटाणू, डासांचा प्रादुर्भाव वाढला असतो. गटारी नसल्याने पाण्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होते.
दरम्यान, झालेल्या अवकाळी पावसाने आधीच अस्वच्छता, पाण्याची डबकी, गटारी तुंबल्याने रोगराई बळावते. अशा मोकळ्या भूखंडावरील गवत काढावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या हद्दवाढीला तब्बल दहा वर्षे झाली. तरीही नववसाहतीत अद्यापही पायाभूत सुविधा उपलब्ध न झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करतात. शहराचा विस्तार व व्यापकता आधीच पूर्व व पश्चिम भागात असतानाच शहरालगतची सोयगाव, माळदे, द्याने, भायगाव, दरेगाव, सायने बुद्रुक या गावांचा हद्दवाढ भागात समावेश झाला. शहरवासीयांना आरोग्य, रस्ते, पाणी यासुविधा अद्यापही बºयाच ठिकाणी अपेक्षित नाही. त्यातच हद्दवाढ भागातील नागरिकांना महापालिकेत समाविष्ट झाल्याचा आनंद वेगळाच. मात्र दहा वर्षांनंतरही हा भाग समस्यांच्या विळख्यात असल्याने ग्रामपंचायत बरी असे म्हणण्याची वेळ आली.

शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात मोकळे भूखंड हे अस्वच्छतेचे आगार बनले आहे. अशा सर्व भूखंडांवरील वाढलेले गवत व झाडेझुडपे काढावीत. महापालिकेने या समस्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
- सोनाली सोनवणे, शाकंभरी कॉलनी

सातत्याने आरोग्य व स्वच्छतेच्या बाबतीत महापालिका ऐरणीवर येत असते. नववसाहतीतील अंतर्गत कॉलनी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सदर रस्त्यांची मलमपट्टी करण्यापेक्षा नव्याने रस्त्याची कामे व्हावीत.
- मनोज पवार, सामाजिक कार्यकर्ते, जिजाऊनगर

रस्त्यावर मधोमध असलेले विजेचे खांब वाहनास अडसर ठरतात. महापालिकेने सदर खांब एका बाजूस घ्यावे. मोकळ्या भूखंडासह वसाहतीत किमान महिन्यातून औषध फवारणी करावी, फॉगिंग करण्याची गरज.

- अनिता कायस्थ, रहिवाशी

शहरासह नववसाहतीतील चौकांचे सुशोभीकरणासाठी पुढाकार घ्यावा. मोकळे भूखंड सेवाभावी संस्था व विधायक कार्य करणाºया संघटनांच्या माध्यमातून विकसित करावेत. खासगी भूखंडमालकांना नोटीस बजावण्यात यावी.
- पंकज वाघ, युवा कार्यकर्ते, आनंद सोसायटी

Web Title: Jijaunagar, Anand, Inspired by Colony Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.