वंजारी समाज जागेसाठी न्यायालयीन लढा उभारणार जितेंद्र आव्हाड : सिन्नरला समाजबांधवांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:13 AM2018-02-05T00:13:06+5:302018-02-05T00:13:59+5:30
सिन्नर : विधायक कामाला विरोध नसून वंजारी समाजाचे मैदान शैक्षणिक संस्थेला देण्याचा निर्णय काही विश्वस्तांनी घेतला आहे. तालुक्यातील वंजारी समाजबांधवांना विश्वासात न घेता विश्वस्तांनी परस्पर हा निर्णय घेतला आहे.
सिन्नर : विधायक कामाला विरोध नसून वंजारी समाजाचे मैदान शैक्षणिक संस्थेला देण्याचा निर्णय काही विश्वस्तांनी घेतला आहे. तालुक्यातील वंजारी समाजबांधवांना विश्वासात न घेता विश्वस्तांनी परस्पर हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात तालुक्यातील वंजारी समाजबांधव एकवटले असून, वंजारी मैदानाच्या जागेसाठी न्यायालयीन लढा उभारणार असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या वंजारी समाजबांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, सुदाम बोडके, छगन अहेर, अशोक आव्हाड, लक्ष्मण सांगळे, शंकर कर्पे, नीलेश सानप, गोपाळ बर्के, भारत दिघोळे, किरण मुत्रक, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड आदी उपस्थित होते. आडवा फाटा येथील वंजारी समाजाची जागा मुंबईत असणाºया वंजारी हमाल बांधवांनी खरेदी केली होती. तालुक्यातील वंजारी समाजाच्या मुलांची शैक्षणिक परवड थांबविण्याचा उद्देश जागा खरेदी करण्यामागचा होता. मात्र, साधारणत: शंभर वर्षांत आपल्याला या जागेवर एक वीटही उभारता न येणे हे दुर्भाग्य असल्याची खंत आमदार आव्हाड यांनी व्यक्त केली. समाजाच्या विधायक कामासाठी ११ लाख रुपयांची देणगी देण्याची घोषणा आव्हाड यांनी यावेळी केली. वंजारी समाज मैदानावर नगरपरिषदेचे आरक्षण पडले त्यावेळी विश्वस्त कोठे होते, असा सवाल आव्हाड यांनी केला. मेळाव्याला समाजबांधव येऊ नये यासाठीही काही जणांनी प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. मैदानावरील विजेचे खांब हटविण्यासाठी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड लागतात. दिलीप वळसे-पाटील ऊर्जामंत्री असताना तब्बल १ कोटी १२ लाख रुपये खर्चून विजेचे खांब काढण्यात आले. तत्कालीन ऊर्जामंत्री तुकाराम दिघोळे यांना साधे मैदानावर विजेचे खांब का काढता आले नाहीत, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. अॅड. अशोक आव्हाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भारत दिघोळे, रमेश आव्हाड, किरण मुत्रक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.
स्थानिक राजकारणात रस नाही
आपल्याला सिन्नरच्या स्थानिक राजकारणात रस नाही. केवळ समाजाच्या अस्मितेसाठी मी सिन्नरला आलो आहे. त्यामुळे मेळाव्यासाठी न येण्याचे शहाणपण इतरांनी शिकवू नये. मी एकट्याच्या जिवावर राजकरण करतो. बाकी काही देणे-घेणे नाही. वंजारी मैदानाचा लढा संपूर्ण ताकदीने लढविणार आहे.