जितेंद्र आव्हाड यांना झेड सुरक्षा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 06:02 PM2018-09-02T18:02:04+5:302018-09-02T18:05:33+5:30
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींच्या डायरीमध्ये हिट लिस्टवरील पाच जणांची नावे आढळून आली आहेत. त्यात सिन्नरचे भूमिपूत्र, माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांचेही नाव आहे. त्यामुळे आमदार आव्हाड यांना झेड सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सिन्नर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Next
राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे, रवींद्र काकड यांच्या नेतृत्वाखाली याबाबत नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीसने मुंबई सत्र न्यायालयात पाच जणांची नावे डायरीत सापडल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी निवेदन देतांना वैभव गायकवाड, सावजी बोडके, संदीप लोखंडे, माधव आव्हाड, पवन जाधव, किरण नळवाडे, प्रमोद पाटील, अजय साळुंके, सुभाष गायकवाड, सुनील पवार, नारायण पवार, रंगनाथ देशमुख, विष्णू वाघ, गोरख वायचळे, अजय साळवे आदींसह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.