‘त्या’ शूर कर्मचाऱ्याच्या पत्नीला नोकरी अन् ३५ लाखांची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 05:51 PM2019-08-20T17:51:29+5:302019-08-20T17:54:31+5:30

नाशिक : जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाºया मुथूट फायनान्स क ार्यालयाचा युवा ...

Job and financial assistance of Rs 1 lakh to the wife of 'that' brave employee | ‘त्या’ शूर कर्मचाऱ्याच्या पत्नीला नोकरी अन् ३५ लाखांची आर्थिक मदत

‘त्या’ शूर कर्मचाऱ्याच्या पत्नीला नोकरी अन् ३५ लाखांची आर्थिक मदत

Next
ठळक मुद्दे‘मुथूट’ने सॅम्युअलच्या कुटुंबाला दिला आर्थिक मदतीचा हातसॅम्युअलच्या मासिक वेतनाची रक्कमदेखील दरमहा पत्नीला सुरू राहणार नाशिक पोलिसांना ५ लाखांचे बक्षीस

नाशिक : जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाºया मुथूट फायनान्स क ार्यालयाचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलचा (२९, रा. मूळ केरळ) दरोडेखोरांनी झाडलेल्या गोळ्यामुंळे मृत्यू झाला होता. त्याच्या शौर्याची दखल घेत ‘मुथूट’ने सॅम्युअलच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला आहे. सॅम्युअल यांची पत्नी जेस्सी यांना एका रूग्णालयात नोकरी तसेच त्यांच्या बॅँक खात्यावर ३५ लाखांची मुदत ठेव अन् सॅम्युअलच्या मासिक वेतनाची रक्कम दरमहा त्यांना मिळणार असल्याचे कंपनीचे उपमहाव्यवस्थापक संजीव आनंद यांनी पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले.
पोलीस आयुक्तालयात मंगळवारी सकाळी झालेल्या ‘स्टार आॅफ द मंथ’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आनंद उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले, अमोल तांबे आदि उपस्थित होते. यावेळी आनंद म्हणाले, साजू सॅम्युअल या धाडसी युवा कर्मचाºयाचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या कंपनीच्या कार्यालयावर आलेल्या संकटाचा मुकाबला क रण्याचे धाडस दाखविले; दुर्दैवाने यावेळी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या प्रामाणिक धैर्याची दखल मुथूट कंपनीने घेतली असून त्यांच्या पत्नीच्या बॅँक खात्यावर ३५ लाख रूपयांची मुदत ठेव तसेच त्यांना मुथूटच्या पथ्थनाउतिथा येथील रूग्णालयात नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगितले. सॅम्युअलच्या मृत्यूसमयी त्याला मिळत असलेल्या मासिक वेतनाची रक्कमदेखील दरमहा त्यांच्या पत्नीला सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सॅम्युअल यांना एक लहान मुलगीही आहे. नांगरे पाटील यांनी आनंद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
सॅम्युअलच्या धाडसाचे कौतुक करत शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला यापुर्वी मिळालेले प्रत्येकी ७० हजार असे एकूण २ लाख १० हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम पोलिसांनी सॅम्यूअल कुटुंबाला मदत म्हणून दिली आहे.
----
नाशिक पोलिसांना ५ लाखांचे बक्षीस
मुथूट दरोड्याचा तपास करून छडा लावत मुख्य सुत्रधारासह दरोडेखोरांना बेड्या ठोकल्याप्रकरणी मुथूट फायनान्स कंपनीच्या वतीने नाशिक पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना कंपनीचे संजीव आनंद यांनी प्रशस्तीपत्रकासह ५लाखांचे बक्षीस प्रदान केले.

Web Title: Job and financial assistance of Rs 1 lakh to the wife of 'that' brave employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.