हिंदू शक्तिशाली असेल तर देशात चांगले काम होईल - भैयाजी जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 11:27 AM2021-10-15T11:27:19+5:302021-10-15T11:27:59+5:30
लोकांना संघटीत करणे हेच संघाचे काम, स्वताला हिंदू म्हणून घेतात त्यांनी जागरूक राहिले पाहिजे
लासलगाव (नाशिक)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशात 1 लाख गावपर्यंत पोहचलो असून अजून सहा लाख गावांपर्यंत पोहोचायचे आहे. संघाचा उद्देश लोकांना संघटित करणे असा असुन संघाचे काम अत्यंत सकारात्मक असुन नकारात्मक कामाला थारा दिला जात नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी लासलगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकासमोर आज विजयादशमी दिनी मार्गदर्शन करतांना केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे लोकांना संघटित करणे हे संघाचे काम अत्यंत सकारात्मक काम असते. नकारात्मक कामाला थारा नाही. हिंदू शक्तिशाली असेल तर देशात चांगले काम होईल, स्वताला हिंदू म्हणून घेतात त्यांनी जागरूक राहिले पाहिजे. या देशात 100 कोटी पेक्षा जास्त हिंदू आहेत पण अनेक जातीत हिंदू विभागला गेल्याने हिंदू एक संघ राहिला नाही. ग्रंथामध्ये धर्माला जात नाही तर हिंदू हीच जात आहे. ते म्हणाले की, आपला देश हा जम्मू- कश्मीर ते तमिलनाडु , राजस्थान ते असम, मेघालय पर्यंत राज्यमध्ये विभागला आहे मात्र देश एक असल्याची संघाची शिकवण असुन देश गुलाम नाही पण विचार आपले गुलाम राहिले तर देश गुलाम होईल. आपल्याकडे 15 ऑगस्ट , 26 जानेवारी रोजी देश भक्ति दिसू येते पण इतर दिवशी देशभक्ति जाते कुठे, विदेशी वस्तुंचा त्याग केला पाहिजे देशी वस्तु घेतल्या पाहिजे, देशात नावदुर्गेची पूजा होते पण महिलांवर का अत्याचार होतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी स्वयंसेवकांनी शपथ घेतली.