कोराेना असे पर्यंतच नोकरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:49+5:302021-03-10T04:16:49+5:30
गेल्यावर्षी मार्च महिन्यातच कोरोना उद्भवला आणि त्यामुळे शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. अचानक उद्भवलेल्या या संसर्गजन्य रोगावर उपचार करण्यासाठी शासकीय ...
गेल्यावर्षी मार्च महिन्यातच कोरोना उद्भवला आणि त्यामुळे शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. अचानक उद्भवलेल्या या संसर्गजन्य रोगावर उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणा अत्यंत कमी पडल्या आणि त्यामुळे नाशिक महापालिकेसमोर देखील मोठे आव्हान उभे होते. कारण पुरसे मनुष्यबळच महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागाकडे नव्हते. त्यामुळे महापालिकेने धावपळ करून शासनाची परवानगी घेत वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य कर्मचाऱ्यांची भरती मेाहिम सुरू केली. काही शासनाच्या पोर्टलवर नोंदवलेले तर काही जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या माध्यमातून कर्मचारी घेण्यात आले. महापालिकेच्या आस्थापनेवरील शेकडो पदे रिक्त असली तरी ही पदे भरताना मात्र तीन तीन महिने कालावधीसाठी भरण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्रे मिळण्यात आणि त्यानंतर वेतन हातात पडण्यात दोनेक महिने कालावधी जात असला तरी सुमारे आठशे कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी कोरोना काळात सेवा दिली आहे. मात्र तीन महिने झाले त्यांना पुन्हा तीन महिन्यांसाठी फेरनियुक्ती दिली जात असे. नोव्हेंबर नंतर कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने जानेवारी अखेर पर्यंत सुमारे आठशे कर्मचारी कामावर हाेते.नंतर मात्र त्यांना निरोप देण्यात आले. आता १० फेब्रुवारीपासून कोरोना वाढू लागला आहे. त्यामुळे कोविड सेंटर करण्याइतपत वेळ आली नसली तरी पूर्वतयारीचा भाग म्हणून २७६ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी काम करणाऱ्यांना संधी दिली गेली असली तरी या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या रिक्तपदांवर कायम सेवेत घेण्याची मागणी केली हेाती. ती पूर्ण झालेली नाही. आताही कर्मचारी घेतले जात असले कोरोना असे पर्यंतच त्यांना संधी दिली जाणार आहे.
इन्फो.
२७६ अधिकारी कर्मचारी रूजू
महापालिकेने यापूर्वी काम केलेल्या २७६ अधिकारी कर्मचाऱ्यांना तीन महिने कंत्राटी स्वरूपात कामावर घेतले आहे. त्यात ३८ डॉक्टर असून उर्वरीत कर्मचाऱ्यांमध्ये नर्स परिचारिका, तंत्रज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अर्थात शहरात एकही कोविड केअर सेंटर सुरू करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे गरजेनुसार कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे.
इन्फो...
८३,४१४
कोरोनाचे एकुण रूग्ण
--
७९,००८
बरे झालेेले रूग्ण
---
३३५०
ॲक्टीव्ह रूग्ण
---
१०५६
कोरोना बळी
----
मनपाची कोरोना रूग्णालये २
--------
सध्या सुरू असलेली कोविड सेंटर्स ०