जोड........महंत नरेंद्रगिरी महाराज....वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:56+5:302021-09-22T04:17:56+5:30
हरिद्वार प्रयागराज व उज्जैन कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय इव्हेंट करण्यात दिवंगत महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. ते अचूक ...
हरिद्वार प्रयागराज व उज्जैन कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय इव्हेंट करण्यात दिवंगत महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. ते अचूक निर्णय घेत. त्यांच्या अकाली निघून जाण्याने आखाडा परिषद पोरकी झाली आहे. ते आत्महत्या करूच शकत नाही. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी.
- महंत हरिगिरी महाराज
महासचिव अ. भा. आखाडा परिषद
महाराजांचे अचानक जाणे न पटणारे
सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या विकासकामात त्यांची मोलाची साथ मिळाली होती. सर्वांना बरोबर घेऊन चालणारे महंत नरेंद्रगिरी महाराज यांचे असे अचानक जाणे कोणालाही न पटणारे आहे.
- पुरुषोत्तम .लोहगावकर, नगराध्यक्ष, त्र्यंबक, नगर परिषद
हरलेल्यांना उमेद देणारे
त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषद व त्र्यंबक नगर परिषद असा आमच्यात एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यांचे व्यक्तिमत्व पाहता ते आत्महत्या करूच शकणार नाही. शाहीमार्गासाठी गरिबांची घरे तोडू नका असे सांगणारे महंत नरेंद्रगिरी महाराज जीवनात हरलेल्या, निराश व्यक्तींना जगण्याची शक्ती निर्माण करीत.
- त्रिविक्रमशास्त्री जोशी, आखाड्याचे पुरोहित, त्र्यंबकेश्वर
घातपात केल्याचा संशय
आयुष्यातून हरणाऱ्या माणसाला उभारी देऊन नवसंजीवनी देणारे महंत नरेंद्रगिरी महाराज आत्महत्या करुच शकत नाही. त्यांनी गेली अनेक वर्षे आखाडा परिषदेचे अध्यक्षपद भुषवून त्र्यंबकेश्वर नाशिक उज्जैन प्रयागराज व हरिद्वार हे चार कुंभ यशस्वीपणे पार पडले.
- महंत शंकरानंद सरस्वती, कोषाध्यक्ष, अ. भा. आखाडा परिषद.
(२१ टीबीके ३ ते १२)