जोड- राजमाता जिजाऊ- विवेकानंद जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:03+5:302021-01-13T04:33:03+5:30
मालेगाव : येथील किल्ला नवीन प्राथमिक शाळेत येथे प्रतिमापूजन मुख्याध्यापिका कविता विकास मंडळ यांनी केले. यावेळी ...
मालेगाव : येथील किल्ला नवीन प्राथमिक शाळेत येथे प्रतिमापूजन मुख्याध्यापिका कविता विकास मंडळ यांनी केले. यावेळी उपशिक्षिका शोभा आहिरे, कल्पना सोनवणे व चेतन निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका मंडळ यांनी मार्गदर्शन केले. आभार विशाल भामरे यांनी मानले.
------------------------------------------------------
वाचनालय, कौळाणे
कवळाणे : येथील महाराजा सयाजीराव गायकवाड सार्वजनिक वाचनालयात कौळाणे येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रवींद्र वाघ होते. त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी युवकांनी वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम या वर्षभरात राबविली जाणार असल्याचे सांगितले. ग्रंथपाल चंद्रकांत कुलकर्णी यांचेही भाषण झाले. रवींद्र वाघ यांनी वाचनालयाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक भेट दिले, तर वाचनालयात विवेकानंद व जिजाऊ साहेबांच्या विचारांचे १५० नवी पुस्तके यावेळी अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी वाचनालयास सुपुर्द केली. सूत्रसंचलन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी दीपक गायकवाड, अविनाश गायकवाड, सावता अहिरे, सुखदेव अहिरे, ज्ञानेश्वर खैरनार, इजाज मन्सुरी, नामदेव खैरनार, प्रशांत कुलकर्णी, संदीप मोरे उपस्थित होते.
–------------–--------------------------
नेहरू विद्यालय पाटणे
मालेगाव : तालुक्यातील पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. एस. पटाईत होते. प्रास्ताविक बी. एस. महाजन यांनी केले. प्रतिमापूजन पटाईत व श्रीमती एस. डी. बागुल यांनी केले. शालेय प्रांगणातील महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन बागले भाऊसाहेब बागले यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे पूजन श्रीमती एस. टी. महाजन यांनी केले. एस. एम. खैरनार, एस. व्ही. सरक यांनी मनोगत व्यक्त केले. एस. डी. आहिरे यांनी आभार मानले . सूत्रसंचालन के. पी. अहिरे यांनी केले