भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:22 AM2017-11-18T00:22:34+5:302017-11-18T00:25:04+5:30
ऊसदर आंदोलक शेतकयांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते, असे बेताल वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीला जोडे मारा आंदोलन करण्यात आले.
नाशिक : ऊसदर आंदोलक शेतकयांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते, असे बेताल वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर परिसरात ऊसदर वाढीसाठी शेतकºयांनी आंदोलन व रास्तारोको केले होते. शेतकºयांनी केलेले आंदोलन म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा असून, तो दडपण्यासाठी शेतकºयांवर गोळीबार करण्यात आला. आंदोलनकर्त्यांवर गोळीबार न करता हा प्रश्न चर्चेने सुटू शकला असता. आंदोलन रोखण्याचे अनेक पर्याय असताना गोळीबार हा पर्याय होऊच शकत नाही हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे या गोळीबार प्रकरणातून स्पष्ट झाले आहे, असा आरोप राष्टवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आला. त्यातच रावसाहेब दानवे यांनी शेतकºयांच्या पायावर गोळी मारण्याचे केलेले वक्तव्य अतिशय निषेधार्ह असल्याचे कॉँग्रेसने म्हटले आहे. दानवे यांनी शेतकºयांची माफी मागावी, अशी मागणी शहराध्यक्ष अंबादास खैरे व शहर उपाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी केली. यावेळी झालेल्या आंदोलनात स्वप्नील सोनवणे, पवन कोराटे, प्रवीण साळुंके, सौरभ मोहाटे, विजय खलाटे, सुमित अवचिते, रोषण काळे, सिद्धार्थ थोरात, चंद्रभान पगारे, आनंद साळवे, अक्षय खापरे, अनिल चव्हाण, बंटी भागवत, मोंटी काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.