राऊत यांच्या प्रतिमेला शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन
By श्याम बागुल | Published: June 3, 2023 04:37 PM2023-06-03T16:37:15+5:302023-06-03T16:42:17+5:30
"शत्रूबद्दलही संयमाने वागण्या-बोलण्याची संस्कृती आहे. परंतु, खासदार संजय राऊत या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम सातत्याने करत आहेत."
नाशिक : शिंदे गटाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या नावे थुंकल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ३) शिंदे गटाच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येऊन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे.
शत्रूबद्दलही संयमाने वागण्या-बोलण्याची संस्कृती आहे. परंतु, खासदार संजय राऊत या संस्कृतीला काळिमा फासण्याचे काम सातत्याने करत आहेत. शिवराळ भाषा वापरणारे राऊत यांनी थुंकण्याचे कृत्य केल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिंदे गटाच्या मायको सर्कल येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
आंदोलनात जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, उपजिल्हाप्रमुख दिगंबर मोगरे, प्रमोद लासुरे, मामा ठाकरे, अमोल सूर्यवंशी, बाबूराव ठाकरे, रोशन शिंदे, दीपक मौले, सचिन भोसले, रूपेश पालकर, अंबादास जाधव, किरण फडोळ, शुभम पाटील, योगेश म्हस्के, मंदाकिनी जाधव, पूजा धुमाळ, आनंद फरताळे आदी उपस्थित होते.