एकटे न राहता छंद  जोपासा : स्वाती पाचपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:42 AM2019-05-23T00:42:49+5:302019-05-23T00:43:05+5:30

ज्येष्ठांनी आयुष्याकडे सकारात्मकपणे पहावे. शिस्त, छंद जोपासावेत, सतत वाचन, लिखाण केल्यास गर्दीत एकटे राहणार नाहीत. स्पर्धा जगाशी न करता स्वत:शी करावी. असे केल्यास ज्येष्ठपण हेदेखील रम्य होईल, असे प्रतिपादन समुपदेशक स्वाती पाचपांडे यांनी केले.

 Jodha: Swati Panchapande | एकटे न राहता छंद  जोपासा : स्वाती पाचपांडे

एकटे न राहता छंद  जोपासा : स्वाती पाचपांडे

Next

नाशिकरोड : ज्येष्ठांनी आयुष्याकडे सकारात्मकपणे पहावे. शिस्त, छंद जोपासावेत, सतत वाचन, लिखाण केल्यास गर्दीत एकटे राहणार नाहीत. स्पर्धा जगाशी न करता स्वत:शी करावी. असे केल्यास ज्येष्ठपण हेदेखील रम्य होईल, असे प्रतिपादन समुपदेशक स्वाती पाचपांडे यांनी केले.
योगीराज गजाजन ज्येष्ठ नागरिक संघाच्या दत्तमंदिररोड येथील व्याख्यानमालेत त्यांनी ‘रम्य ते ज्येष्ठपण’ यावर पुष्प गुंफले. पाचपांडे म्हणाल्या की, ज्येष्ठांनी चिंता सोडून चिंतन करावे. जगण्याला व्यवस्थापनाची जोड दिली तर यश मिळेल. कुटुंबात स्वत:साठी जागा ठेवावी. संवाद प्रवाही ठेवावा. वाचन, ध्यान, व्यायाम करा. आपल्या जगण्याचा उपयोग इतरांसाठी करा. सकारात्मक रहा. बदलत्या काळानुसार कुटुंब व्यवस्था बदलत असते, हे लक्षात घेऊन स्वत:मध्ये बदल घडवा.असेही त्यांनी सांगितले़
निवृत्ती म्हणजे नवे जगण्याची आवृत्ती. मानसिक असुरक्षिततेमधून ज्येष्ठांनी बाहेर पडावे. वृद्धत्व येणार हे मनाने स्वीकारा. कालचक्र अविरत सुरू असते. शहाणपणाने ते स्वीकारले तर जीवन सुखी होईल. ज्येष्ठत्व हे स्मार्टपणे स्वीकारा. अनुभव माणसाला गरु डभरारी देतो. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हावे. जीवन आनंदी करणे आपल्या हातात असते. जगण्याला व्यावहारिकतेची जोड द्या. ज्येष्ठांनी संगणक, स्मार्टफोनसारखे नवीन तंत्रज्ञान वापरताना भान ठेवावे.
आजचे व्याख्यान
वक्ते : सतीशकुमार पाटील
विषय : आरोग्य मनाचे आणि शरीराचे

Web Title:  Jodha: Swati Panchapande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.