दिंडोरीत जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:30 PM2020-01-03T22:30:45+5:302020-01-03T22:31:07+5:30

दिंडोरी : तालुक्यातील शिवनई येथे होणाऱ्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव व बंकटस्वामी महाराज अमृतमहोत्सवाचे ध्वजारोहण ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते झाले.

Jog Maharaj anniversary celebrations in Dindori | दिंडोरीत जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव

जोग महाराज शताब्दीमहोत्सव कार्यक्रमाच्या ध्वजारोहणप्रसंगी बंडा महाराज कराडकर, पांडुरंग गडकरी व उत्सव समितीचे सदस्य, भाविक.

Next

 



दिंडोरी : तालुक्यातील शिवनई येथे होणाऱ्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पुण्यतिथी शताब्दीमहोत्सव व बंकटस्वामी महाराज अमृतमहोत्सवाचे ध्वजारोहण ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते झाले.
हा कार्यक्रम गुरुवारी ९ ते १६ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम होणार असून, यावेळी संत तुकाराम चरित्र कथा सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. दि. ९ जानेवारी रोजी श्रावण आहिरे यांचे प्रवचन व ज्ञानेश्वर पाटील जळकेकर यांचे कीर्तन, दि. १० किशोर महाराज खरात यांचे प्रवचन, संजय जी. पाचपोर, अकोला यांचे कीर्तन, दि. ११ विश्वनाथ कोल्हे यांचे प्रवचन व उमेश दशरथे यांचे कीर्तन, दि. १२ दामोदर गावले यांचे प्रवचन, पांडुरंग घुले, अध्यक्षगाथा मंदिर, देहू यांचे कीर्तन, दि. १३ समाधान महाराज, रिंगणगावकर यांचे प्रवचन, ज्ञानेश्वर माउली कदम यांचे कीर्तन, दि. १४ आचार्य महामंडलेश्वर रामकृष्ण दासजी लहवितकर यांचे प्रवचन, संदीपान महाराज शिंदे यांचे कीर्तन, दि. १५ ज्ञानेश्वर माउली गोरे, आळंदी यांचे प्रवचन, अनिल पाटील, बार्शीकर यांचे कीर्तन, दि. १६ मठाधिपती माधव महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्र माची सांगता होणार आहे.

 

 

Web Title: Jog Maharaj anniversary celebrations in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.