जॉगिंग ट्रॅक, जिम, मैदानांवर नाशिककरांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:17 PM2017-11-28T12:17:11+5:302017-11-28T12:17:22+5:30

Jogging track, gym, rush of Nashikar on plains | जॉगिंग ट्रॅक, जिम, मैदानांवर नाशिककरांची गर्दी

जॉगिंग ट्रॅक, जिम, मैदानांवर नाशिककरांची गर्दी

Next


नाशिक- थंडीचा पारा वर चढत असला तरी आरोग्याच बाबतीत जागरुक असणाºया नाशिककरांनी जॉगिंग टॅक, जिम, मैदानांवर व्यायामासाठी गर्दी केल्याचे दिसून येत असून व्यायामासाठी भल्या पहाटे नागरिकांची पावले घराबाहेर पडत असल्याचे पहायला मिळत आहे. जॉगिंग ट्रॅकवर अबालवृद्धांची गर्दी दिसत असून स्वेटर, मफलर, शाली, कानटोपी अशी सारी सिद्धता केलेले व्यायामप्रेमी राऊंड मारल्यानंतर शेकोटीचाही आस्वाद घेताना दिसत आहे. एरवी कंटाळा करत जिमला दांड्या मारणारी तरुणाई सध्या मात्र नियमीतपणे जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. महिलावर्ग जवळपासच्या परिसरात चक्कर मारण्यावर भर देत असून येताना दुध, भाजी, फुले, फळे खरेदी करुन आणत असल्याचेही चित्र आहे. व्यायाम झाल्यावर जवळच्या टपरीवर गरमागरम चहाचा आस्वादही घेतला जात असून गप्पांच्या मैफली रंगत आहेत.
थंडीचा महिना हा आरोग्यसंपदा मिळवण्यासाठी महत्वाचा मानला जातो. आपल्या ऋषीमुनींनीही त्याचे महत्व ग्रंथांमध्ये लिहून ठेवले आहे. मागील काही वर्षांपासून नाशिकमध्ये निचांकी तपमान असल्याचे दिसून येत आहे. पहाटेच्या वेळी तपमानाचा पारा १० अंश इतका खालावत आहे. थंडीचे आगमन झाल्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर व्यायाम करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. हुतात अनंत कान्हेरे मैदान, त्रंदिरानगर, कृषीनगर, डिजीपीनगर, सिडको, सातपूर, नाशिकरोड आदि विविध भागातले जॉगिंग ट्रॅक नागरिकांच्या गर्दीने फुललेले दिसत आहे. महिला, पुरुष, वृद्ध, तरुण थंडीचा आस्वाद घेत आहेत. ग्रिन जिमला महिलांची पसंती मिळत आहे. जिमबरोबरच योगा व प्राणायाम वर्गांनाही गर्दी वाढत आहे. ज्यांना सकाळी शक्य नाही ते सायंकाळी व्यायामासाठी वेळ काढत आहेत. पुरेपुर व्यायाम झाल्यानंतर व्यायामप्रेमी गरमागरम चहा, कॉफी, सुप, मसाला दुध, जिलबी आदिंचा स्वाद घेताना दिसत आहे.

Web Title: Jogging track, gym, rush of Nashikar on plains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.