‘जॉइन द चेंज’मधून तंबाखुमुक्त नाशिकचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:48 AM2018-04-02T00:48:36+5:302018-04-02T00:48:36+5:30

नाशिक : तंबाखूसारख्या व्यसनमुक्तीसाठी शहरातील विविध संस्था पुढे सरसावल्या आहेत. तंबाखुमुक्त नाशिकसाठी ‘जॉइन द चेंज’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

'Join the change' appeals to tobacco-free Nashik | ‘जॉइन द चेंज’मधून तंबाखुमुक्त नाशिकचे आवाहन

‘जॉइन द चेंज’मधून तंबाखुमुक्त नाशिकचे आवाहन

Next
ठळक मुद्देविविध संथांच्या पुढाकाराने या अभियानाचा शुभारंभतंबाखू सेवनाची बाब भावीपिढीच्या आरोग्यासाठी घातक

नाशिक : तंबाखूसारख्या व्यसनमुक्तीसाठी शहरातील विविध संस्था पुढे सरसावल्या आहेत. तंबाखुमुक्त नाशिकसाठी ‘जॉइन द चेंज’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक शहराचे सौंदर्य व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधनात्मक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या कल्पनेतून विविध संथांच्या पुढाकाराने या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अभियानाच्या बोधचिन्हाचे व फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. भारतात तंबाखूविरोधात २००३ साली कायदा आला तरी त्यासंदर्भात जाणीव तसेच जागरूकता समाजात निर्माण झाली नाही. कारण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही, असे सांगून ज्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे, त्यावर पोलिसांनी मोहीम सुरू केली असून, त्याची कारवाईत वाढ करून प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सिंगल यांनी उपस्थिताना दिले. एचसीजी मानवता हॉस्पिटलचे संचालक डॉ. राज नगरकर यांनी समाजामध्ये ४० वयोगटांखाली कर्करोगाचा रुग्णांचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तंबाखू सेवनाची बाब भावीपिढीच्या आरोग्यासाठी घातक असून, यामुळे समाजाची मोठी हानी होत आहे, अशी माहिती दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी पालकांनी याबाबत जागृत राहण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शन रतन लथ यांनी केले.

Web Title: 'Join the change' appeals to tobacco-free Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.