मला मूळ गावामध्ये सामावून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:54 PM2020-02-22T23:54:58+5:302020-02-23T00:18:41+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात कसमादे परिसराचा कारभार हा गोव्यातून चालत होता. दोनशे वर्षांपूर्वी आमचे पणजोबा हे न्याय निवाड्यात अग्रेसर होते. त्यामुळे आमचे कुटुंबीय खालप गाव सोडून गेलो असलो तरी खालप माझे मूळ गाव असून, मला गावात सामावून घ्या अशी मागणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी केली.
लोहोणेर : स्वातंत्र्यपूर्व काळात कसमादे परिसराचा कारभार हा गोव्यातून चालत होता. दोनशे वर्षांपूर्वी आमचे पणजोबा हे न्याय निवाड्यात अग्रेसर होते. त्यामुळे आमचे कुटुंबीय खालप गाव सोडून गेलो असलो तरी खालप माझे मूळ गाव असून, मला गावात सामावून घ्या अशी मागणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी केली.
देवळा तालुक्यातील खालप येथील सदिच्छा भेटीप्रसंगी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप पवार होते. शुक्रवारी (दि.२१) दुपारी खालप येथील बांधकाम ठेकेदार दिनेश जाधव यांना खलप यांचा भ्रमणध्वनी आला असता त्यांनी आपल्या मूळ गावाविषयी सविस्तर चर्चा केली. रात्री अचानक दूरध्वनी करून त्यांनी आपण शनिवारी सकाळी खालप गावी येत असल्याचे सांगितले. यामुळे ग्रामस्थांचे कुतुहल जागृत होऊन धावपळ सुरू झाली. रमाकांत खलप यांचे सकाळी गावात आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत लेजीम नृत्यासह गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी खालप गावाचा गोव्याशी असलेला संबंध ग्रामस्थांसमोर मांडला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळवण तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, दीपक दुसाने, प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सरपंच नानाजी सूर्यवंशी, माजी उपसरपंच कपिल सूर्यवंशी, बारकू सूर्यवंशी, भगवान आहिरे, अविनाश सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, रमेश शिरसाठ, बाजीराव सूर्यवंशी, डॉ. नंदकुमार जाधव, यशवंत सूर्यवंशी, रखमाजी सूर्यवंशी, दगा सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, बाळू सूर्यवंशी, बाबूराव सूर्यवंशी, मोठाभाऊ सूर्यवंशी, वसंत सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी,आर्किटेक्ट प्रमोद सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोव्याबरोबरचा संबंध मांडला
खालप येथील बांधकाम ठेकेदार दिनेश जाधव यांना खलप यांचा भ्रमणध्वनी आला असता त्यांनी आपण शनिवारी सकाळी खालप गावी येत असल्याचे सांगितले. रमाकांत खलप यांचे सकाळी गावात आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी खालप गावाचा गोव्याशी असलेला संबंध ग्रामस्थांसमोर मांडला.