रसिकांना लाभला ‘कलानंद’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:28 AM2019-09-17T01:28:48+5:302019-09-17T01:29:02+5:30

नृत्यात नुकतीच डॉक्टरेट मिळविलेल्या सुमुखी अथनी यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या प्रबंधावर आधारित मातृभुवंदना, धृवपद, सादरा, सावनी व तराणा अशा फारशा प्रचलित नसलेल्या बंदिशींचे सादरीकरण करीत रसिकांची मनमुराद दाद मिळविली. ‘कथक परिक्रमा’ या नृत्य सोहळ्याने रसिकांना नेहमीपेक्षा वेगळ्या कथक नृत्याच्या सादरीकरणाचा आनंद घेता आला.

 Jokes get 'kalananda'! | रसिकांना लाभला ‘कलानंद’ !

रसिकांना लाभला ‘कलानंद’ !

Next

नाशिक : नृत्यात नुकतीच डॉक्टरेट मिळविलेल्या सुमुखी अथनी यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या प्रबंधावर आधारित मातृभुवंदना, धृवपद, सादरा, सावनी व तराणा अशा फारशा प्रचलित नसलेल्या बंदिशींचे सादरीकरण करीत रसिकांची मनमुराद दाद मिळविली. ‘कथक परिक्रमा’ या नृत्य सोहळ्याने रसिकांना नेहमीपेक्षा वेगळ्या कथक नृत्याच्या सादरीकरणाचा आनंद घेता आला.
कलानंद कथक नृत्य संस्थेचा वर्धापनदिन आणि संस्थेच्या संचालिका डॉ.सुमुखी अथनी यांना मिळालेल्या डॉक्टरेट पदवीनिमित्त सादर झालेल्या भावदर्शन या नृत्यमय कार्यक्र मास नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त नृत्यातील धृवपद, सादरा, सावनी व तराणा अशा अप्रचलित बंदिशींचे सुंदर प्रदर्शन नाशिककरांना झाले.
कालिदास कलामंदिर नाट्यगृहात कलानंद संस्थेचा कथक परिक्र मा हा नृत्यांचा कार्यक्र म पार पडला. देशातील कथक नृत्यांगना मंजिरी देव व श्रीराम देव यांच्या प्रमुख उपस्थितीत कलानंदच्या विद्यार्थिनींनी गणेशगान, तीनताल, एकताल, आलाप आदींची प्रस्तुती केली.
या कार्यक्र मात तबलासाथ नितीन पवार व व्यंकटेश कांबळे यांनी केली, तर संवादिनीवर पुष्कराज भागवत व बासरीवर मोहन उपासनी तसेच सिंथेसायझरवर अनिल धुमाळ यांनी संगीतसाथ केली.
पहिल्या सत्रात मंजिरी देव व श्रीराम देव यांच्या हस्ते डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सुमुखी अथनी यांचा सत्कार करण्यात आला. कलानंदच्या संस्थापक संजीवनी कुलकर्णी यांच्या हस्ते मंजिरी देव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंजिरी देव यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मौलिक मार्गदर्शन केले. उत्तरोत्तर हा कार्यक्र म रंगत गेला व नाशिककरांनी या कथक नृत्याचा आनंद लुटला.

Web Title:  Jokes get 'kalananda'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.