परतीच्या पावसाने हिरावला सणाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 11:03 PM2020-10-24T23:03:04+5:302020-10-25T01:32:35+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसापासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कापूस, मका, कांदा रोपे, कांदा पिकांची दाणादाण झाल्याने ऐन दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांचा आनंद हिरावून नेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मका, सोयाबीन पिकांचे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाओ आहे.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात गेली दहा-पंधरा दिवसापासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कापूस, मका, कांदा रोपे, कांदा पिकांची दाणादाण झाल्याने ऐन दसरा-दिवाळीला शेतकऱ्यांचा आनंद हिरावून नेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मका, सोयाबीन पिकांचे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाओ आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका सोंगून ठेवलेला आहे तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची गंजी मारून ठेवलेली आहे. चार चार वेळेस कांदा बियाणे टाकूनही जमिनीवर येण्याच्या अगोदरच मुसळधार पावसाच्या तडाख्याने झोडपल्याने कांदा बियाणे संपुष्टात येऊन हजारो रुपये खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले असून, शेतकऱ्यांना कांदा पिकाला मुकावे लागणार असून, अगोदरच लावलेला पोळ कांदा नष्ट झालेला असताना कांदा पीक संकटात सापडले आहे तर अनेक शेतकऱ्यांचे मुसळधार पावसाने मका ,कापुस, सोयाबीन ,कांदा पिक पाण्यात असून, एकूणच खरिपातील पिकांची दानादान झाल्याने शेतकरी दसरा-दिवाळीच्या आनंदावर पाणी सोडून खरिपातील पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.
गेली दहा- पंधरा दिवसापासून परतीच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सोंगणीसाठी आलेले मका,सोयाबीन ,व कापुस या पिकांना मात्र त्याचा फटका बसत असून पिके संकटात सापडल्याने शेतकरी दरवर्षी दसरा या सणाला सोने वाटून आनंद साजरा करत असतो पण यावर्षी मात्र कोरोना संकटानंतर आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने दसरा सणा वर विरजण पडले आहेत.