मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर नाशिकमध्ये मराठा समाजाचा जल्लोष
By संजय पाठक | Published: January 27, 2024 02:58 PM2024-01-27T14:58:58+5:302024-01-27T14:59:21+5:30
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर हे आरक्षण सोडवण्यात आले होते
नाशिक- मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने अध्यादेश जारी केल्यानंतर आज सकाळी नाशिक मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला नाशिक शहरातील सीबीएस जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मराठा समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नाशिकमध्ये 50 दिवसांहुन अधिक दिवस साखळी उपोषण ही करण्यात आले होते.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर हे आरक्षण सोडवण्यात आले होते. दरम्यान जरांगे यांच्या समवेत नाशिक मधून मराठा समाजाचे कार्यकर्तेही मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आज आरक्षणासंदर्भातील अध्यादेश जाहीर झाल्याचे कळल्यानंतर नाशिक मध्ये विविध मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला या जल्लोषात चेतन शेलार, चंद्रकांत बनकर, निलेश शेलार, राजेंद्र शेळके, योगिता पाटील, राजेश पवार, संदीप निगळ, संगीता पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते