न्यायाधीशांची पर्स चोरणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:51 AM2018-07-18T00:51:29+5:302018-07-18T00:51:49+5:30
इगतपुरी : अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत असताना कसारा घाटात गाडी थांबली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पर्समधून एक लाख ६७ हजार रुपयांची चोरी करण्याऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.
इगतपुरी : अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत असताना कसारा घाटात गाडी थांबली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पर्समधून एक लाख ६७ हजार रुपयांची चोरी करण्याऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी गोपनीय खबरीमार्फत केला असता चोरीस गेलेला मोबाइल हा वाशाळा फुगाळे (ता. शहापूर, जि. ठाणे ) या गावातील एका तरु णाकडे मिळून आला. त्या अनुषंगाने तपास केला असता कसारा गावात राहणारे दत्तू ऊर्फसर्किट पोपट ढोन्नर (४०) व रवींद्र नामदेव धोंगडे (१८) यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
या दोघांना अटक करून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेला मोबाइल व सोन्याचे दागिने असा १ लाख १८ हजार ५०० रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या दोघांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर करून पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी अशा प्रकारचे अजूनही काही गुन्हे कसारा घाटात केले आहेत का? याचा तपास पोलीस हवालदार दीपक निकम, हेमंत घरटे, अंबादास कातोरे, श्यामसुंदर अमृतकर, सतीश खार्डे यांचे पथक करीत आहे.
रेल्वे पोलिसांत तक्रार
न्यायाधीश माधुरी अनुप बरलिया या दि. १८ जून रोजी अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करीत असताना रात्रीच्या वेळेस कसारा घाटात गाडी थांबली असता त्यांच्याजवळील असलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख रक्कम असा
१ लाख ६७ हजार रु पयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्र ार रेल्वे पोलीस ठाण्यात दिली होती.