महिला जळीतप्रकरणी न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:41 AM2020-02-21T01:41:55+5:302020-02-21T01:43:10+5:30

लासलगाव येथील बसस्थानकावर घडलेल्या महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयित आरोप रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत यास न्यायालयाने ५ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर पीडितेस बाटलीत पेट्रोल देणाऱ्या पंपावरील कर्मचाºयास जामीन मंजूर केला.

Judicial custody for woman burning | महिला जळीतप्रकरणी न्यायालयीन कोठडी

महिला जळीतप्रकरणी न्यायालयीन कोठडी

googlenewsNext

लासलगाव: येथील बसस्थानकावर घडलेल्या महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयित आरोप रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत यास न्यायालयाने ५ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर पीडितेस बाटलीत पेट्रोल देणाऱ्या पंपावरील कर्मचाºयास जामीन मंजूर केला.
गेल्या शनिवारी (दि. १५) लासलगाव बसस्थानकावर लग्नाच्या वादातून झटापट होत पेट्रोल अंगावर सांडल्याने महिला पेटली होती. त्यात ती गंभीररीत्या भाजली होती. या घटनेनंतर पोलिसांनी मुख्य संशयित रामेश्वर भागवत यास येवला येथून तातडीने ताब्यात घेत अटक केली होती. पोलिस कोठडीत असलेल्या भागवत यास गुरुवारी (दि.२०) निफाड न्यायालयाचे न्यायाधिश एस. बी. काळे यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे तसेच सरकारी वकील अ‍ॅड. राजीव तडवी यांनी तपास कामांची माहिती दिली.

Web Title: Judicial custody for woman burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.