विमान सेवेला १ जूनचा मुहूर्त
By admin | Published: May 26, 2016 11:16 PM2016-05-26T23:16:47+5:302016-05-26T23:46:53+5:30
हेमंत गोडसे : पुन्हा एकदा एअर इंडियाकडून वेळापत्रक जाहीर
नाशिक : नाशिक-मुंबई विमानसेवेचा पुन्हा एकदा मुहूर्त जाहीर करण्यात आला असून, येत्या १ जूनपासून एअर इंडियाकडून नाशिक-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
एअर इंडियाचे अधिकारी अनिल मेहता यांना यासंदर्भात तन्वीर मौलवी यांनी वेळापत्रक सादर केले असून, अनिल मेहता यांनी संबंधित वेळापत्रकाची प्रत खासदार हेमंत गोडसे यांना पाठविली आहे. त्यात
१ जूनपासून मुंबई व पुणे विमानतळावरून आंतरदेशीय विमानसेवा सुरू करण्याबाबत एअर इंडियाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात मुंबई विमानतळावरून मुंबई ते भुज, भुज ते मुंबई, मुंबई ते दिव व दिव ते मुंबई, मुंबई ते हुबळी, हुबळी ते मुंबई, तसेच मुंबई ते सूरत व सूरत ते मुंबई आदि विमानसेवा
१ जूनपासून सुरू करण्याचे जाहीर केले आहे. तसेच पुणे विमानतळ वाहनतळ असलेल्या विमानसेवांमध्ये पुणे ते मुंबई, मुंबई ते पुणे, मुंबई ते ग्वालीयर, ग्वालीयर ते मुंबई, मुंबई ते भावनगर व भावनगर ते मुंबई आदि विमानसेवांबरोबरच नाशिक ते मुंबई व मुंबई ते नाशिक अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)