जुने नाशिकसाठी जून ठरतोय घात महिना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:54 PM2020-06-16T22:54:48+5:302020-06-17T00:36:40+5:30

नाशिक : संचारबंदीच्या चौथ्या टप्प्यापासून जुने नाशिक आणि वडाळागाव परिसर कोरोना पूर्वीसारखे सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोनाबाधितांची संख्या, तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली.

June is the worst month for old Nashik! | जुने नाशिकसाठी जून ठरतोय घात महिना !

जुने नाशिकसाठी जून ठरतोय घात महिना !

Next

नाशिक : संचारबंदीच्या चौथ्या टप्प्यापासून जुने नाशिक आणि वडाळागाव परिसर कोरोना पूर्वीसारखे सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोनाबाधितांची संख्या, तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली. गत पंधरा दिवसांत नाशकात झालेले बाधित दोन-तृतीयांश प्रमाण हे केवळ जुने नाशिक आणि वडाळागाव परिसरातील असल्याने आरोग्य विभागाच्या दृष्टीने ही सर्व सर्वाधिक चिंतेची बाब ठरत आहे. जुने नाशिक भागातील कथडा, गंजमाळ, भद्रकाली, मदिना चौक, दूध बाजार, कोकणी पुरा, कुंभार वाडा, नानावली, मोठा राजवाडा, वडाळानाका, वडाळागाव संपूर्ण परिसरातील घरांपैकी कुठे ना कुठे कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक शहरातील सर्वाधिक घनदाट वस्ती ही केवळ या परिसरातच प्रामुख्याने आढळून येते. या भागांमध्ये बहुतांश घरे ही एकमेकांना लागून आणि समोरील घरेदेखील अवघ्या काही फुटाच्या अंतरावर असल्याने नाशिक विभागातील कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या याच भागांमधून निर्माण होण्याची भीती आरोग्य विभागासह महापालिका प्रशासनाला वाटत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सामान्य ग्रामस्थदेखील कसोशीने नियमांचे पालन करीत असताना महानगरातील नागरिक मात्र कोरोनापूर्वीच्या जगात वावरत असल्यासारखेच महानगरातील प्रत्येक बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळेच आठवडाभरापासून नाशिकमधील बाधित रुग्णसंख्या तसेच मळ्यात व्यक्तींच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरात झालेले सर्वाधिक मृत्यू हे जून महिन्यात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
--------------------
आरोग्य विभाग चिंतित : बाधितांची संख्या अधिक; दाट लोकवस्ती
पावसाळ्याला सुरुवात झाल्याने साथीचे आणि दूषित पाण्यासह व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण नेहमीप्रमाणेच वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला रोखायचे की साथीच्या आजाराच्या प्रसाराकडे लक्ष द्यायचे, अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जुने नाशिक आणि वडाळागाव परिसर केवळ हॉटस्पॉट नव्हे तर घातस्पॉट आणि डेथस्पॉट ठरण्याचा खूप मोठा धोका महापालिका आणि आरोग्य प्रशासनाला जाणवू लागला आहे.

Web Title: June is the worst month for old Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक