जंक फूडचे आकर्षण चिंताजनक :  पल्लवी दराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:08 AM2019-09-10T01:08:21+5:302019-09-10T01:08:44+5:30

प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासह हाविद्यालयांमधील उपाहारगृहांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी केले आहे.

 Junk Food Attractions Worried: Pallavi rates | जंक फूडचे आकर्षण चिंताजनक :  पल्लवी दराडे

जंक फूडचे आकर्षण चिंताजनक :  पल्लवी दराडे

googlenewsNext

नाशिक : प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासह हाविद्यालयांमधील उपाहारगृहांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी केले आहे. जंक फूडच्या वाढत्या आकर्षणाविषयीही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.
अन्न व औषध विभागातर्फे सोमवारी (दि.९) मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आहारतज्ज्ञ मयुरी जोशी, औषधे सह आयुक्त दुष्यंत भामरे, अपर्णा फरांदे आदी उपस्थित होते.
मुलांना उपलब्ध होणारे अन्नपदार्थ हे पौष्टिक व सुरक्षित असतीलच याची हमी नसते. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात. त्यामुळे काही भागांत कुपोषणाची तर काही भागांत लठ्ठपणाची समस्या उद्भवते. असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सोसायटी फॉर प्रिव्हेशन आॅफ हायपरटेंशन अ‍ॅण्ड डायबेटस (इंडिया)चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र आगरकर यांनी जंक फूडचे धोके अधोरेखीत केले. सहायक आयुक्त प्रशांत उमराणी व अन्नसुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रारंभी नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर सांळुके यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, पल्लवी दराडे यांच्या हस्ते याप्रसंगी पूर्वीचा मेनू बदलून आरोग्यदायी मेनू तयार करणाºया शाळा, महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  Junk Food Attractions Worried: Pallavi rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक