मºहळ येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:53 PM2018-08-11T18:53:24+5:302018-08-11T18:53:40+5:30

सिन्नर : तालुक्यातील मºहळ येथील जामनदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारा जेसीबीची तोडफोड करण्यात आल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

The junkie smugglers who illegally used the illegal sand at the pitch | मºहळ येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबीची तोडफोड

मºहळ येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबीची तोडफोड

Next

सिन्नर : तालुक्यातील मºहळ येथील जामनदी पात्रात अवैध वाळू उपसा करणारा जेसीबीची तोडफोड करण्यात आल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
गेल्या अनेक दिवसांपासून मºहळ येथील जामनदीपात्रातून अवैध वाळू उपसा केला जात आहे. या ठिकाणी वाळू माफियांनी हजारो ब्रास वाळू वाहून नेल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करुनही त्याचा उपयोग नसल्याने काही तरुणांनी नदीतून वाळू उपसा होऊ नये यासाठी राखण करण्यास सुरवात केली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वीस ते तीस तरुणांना नदीपात्रात वाळूच्या ट्रक व जेसीबी आढळून आले. युवक नदीपात्रात येताच वाळूच्या ट्रक पसार झाल्या. तर नदी पात्रात वाळू काढणारा जेसीबी येथील ग्रामस्थांनी ताब्यात घेतला. याबाबत महसूल व पोलीस यांना माहिती देऊनही कोणीही न आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
सुमारे दोन तास वाट पाहूनही कोणीही या ठिकाणी पोहचत नसल्याने जेसीबीची फोडतोड करण्यात आल्याचे समजते. उशिराने पोलीस या ठिकाणी पोहचले. ग्रामस्थ सकाळी सहा वाजेच्या दरम्यान पोहचले तर पोलीस कर्मचाºयांनी नदीपात्रातला जेसीबी नदीच्या बाहेर काढल्याने या ठिकाणी आणखी तणावाचे वातावरण निर्माण झाले. उशीराने तलाठी एच. एच. रितपुरे या ठिकाणी पोहचल्यानंतर पंचनामा केला व पोलिसांना कळवून जेसीबी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समजते.
याठिकाणाहून सुमारे दोन हजार ब्रास वाळू उपसा झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. वाळू माफियांना स्थानिकांची मदत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: The junkie smugglers who illegally used the illegal sand at the pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.