जमाबंदी आयुक्तांनी घेतली झाडाझडती; पिछाडी : प्रॉपर्टी कार्ड, संगणकीय सातबाराच्या कामावर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:05 AM2017-12-12T01:05:25+5:302017-12-12T01:11:03+5:30
नाशिक : शहरी हद्दीत राहणाºया नागरिकांच्या ताब्यातील जमिनींचे मोजमाप करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे व अशा प्रॉपर्टी कार्ड दिलेल्या व्यक्तींचा सातबारा उतारा कायमस्वरूपी बंद करण्याच्या कामात भूमी अभिलेख खात्याच्या सुरू असलेल्या संथगतीवर राज्याचे जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधित अधिकाºयांची चांगलीच झाडाझडती घेतली. ज्या ज्या ठिकाणचे भूमापनाचे काम झालेले असेल तेथील सातबारा उतारे तत्काळ बंद करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

नाशिक भेटीवर आलेले चोक्कलिंगम यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सातबारा संगणकीकरण व भूमी अभिलेख दस्तावेजाच्या कामाची माहिती घेतली. शहरी भागात राहणाºया जमीन मालकांच्या ताब्यात असलेल्या सर्व्हे नंबर व गट नंबरची उताºयावर असलेल्या क्षेत्रफळानुसार त्याची मोजणी करणे व सदर मोजणी केलेल्या मालमत्तेचे पत्रक जागा मालकाच्या ताब्यात देण्याची शासनाची योजना आहे. अशा प्रकारे मालमत्ता पत्रक मिळालेल्या जागा मालकाला त्याच्या मालमत्तेची कुंडलीच हाती पडून त्यावर बनावट दस्तावेज वा अन्य प्रकारे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. नाशिक शहरात भूमी अभिलेख खात्याकडून अनेक वर्षांपासून सदरचे काम सुरू असले तरी, या कामाची असलेली संथगती व एकूण खातेदारांची संख्या पाहता संपूर्ण शहरातील जागा मालकांना मालमत्ता पत्रक मिळण्यास बराच कालावधी लागणार असल्याचे या आढावा बैठकीत स्पष्ट झाल्याने चोक्कलिंगम यांनी अधिकाºयांना धारेवर धरले.
दरम्यान, संगणकीय सातबारा प्रकरणी चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत या कामाला गती देण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. संगणकीय सातबारा कामात जिल्ह्याची प्रगती समाधानकारक नसल्याने या कामाला गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे त्यांनी अधिकाºयांना सांगितले.अधिकाºयांची खरडपट्टीमालमत्ता पत्रक वाटप केलेल्या जमीनमालकाचा सातबारा उतारा कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश यापूर्वीच जमाबंदी आयुक्तांनी दिलेले असतानाही अद्यापही सातबारा उतारा दिला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली व दुहेरी कामात शासनाचा वेळ व पैसा वाया जात असल्याचे सांगून अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली.