सिन्नरला जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 18:42 IST2018-08-28T18:42:23+5:302018-08-28T18:42:51+5:30
नगर परिषदेच्या वतीने सरदवाडी रस्त्यावरील गंगोत्रीनगरमधील सरदवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर साकारण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

सिन्नरला जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर
सिन्नर : येथील नगर परिषदेच्या वतीने सरदवाडी रस्त्यावरील गंगोत्रीनगरमधील सरदवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर साकारण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
सहा मीटर रूंदीच्या या ट्रॅकच्या भूमिगत गटारीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ठिकठिकाणी चेंबरही उभारण्यात आले आहे. या चेंबरच्या लेव्हलची माहिती घेत टॅकवर चालण्यास त्यातून अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आमदार वाजे यांनी केल्या. पावसाळा सुरू असल्याने मुरूम पसरविण्यास इतर कामे बंद आहेत. या परिसराला ग्रीन बोल्ट म्हणून सुशोभित करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष किरण डगळे यांनी सांगितले.
ट्रॅकच्या उभारणीमुळे ज्येष्ठ नागरिकांसह व्यायामासाठी व फिरण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, नगरसेवक सोमनाथ पावसे, गोविंद लोखंडे, श्रीकांत जाधव, निरूपमा शिंदे, गीता वरंदळ, ज्योती वामने, तुषार लोखंडे, रावसाहेब आढाव, वसंत गोसावी, पोपट माळी, उदय कुलकर्णी, रवि आरोटे, दत्ता ढमाले, लक्ष्मण सांगळे, बाळासाहेब झोळेकर, सूर्यभान सदगीर, बाबूराव विसे, मनोज शिंदे, गणेश खापरे परिसरातील नागरिक उपस्थित होते.