जिंदालच्या वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:10 AM2019-01-15T01:10:41+5:302019-01-15T01:11:52+5:30

वणी : इगतपुरीच्या जिंदाल पॉलिफिल्म कंपनीच्या वाहनचालकांना चाकूने जखमी करून वाहनासह रोख रकमेची जबरी लूट करणाºया पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले असून, एक संशयित फरार आहे. दोन्ही कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Junky's gang robbery gangs | जिंदालच्या वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड

जिंदाल कंपनीच्या वाहनचालकांना लुटणाऱ्या पाच संशयितांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी.

Next
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : सहा संशयितांवर गुन्हा दाखल

वणी : इगतपुरीच्या जिंदाल पॉलिफिल्म कंपनीच्या वाहनचालकांना चाकूने जखमी करून वाहनासह रोख रकमेची जबरी लूट करणाºया पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले असून, एक संशयित फरार आहे. दोन्ही कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
दि. ४ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास गोंदे एमआयडीसी ता. इगतपुरी येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीचे पिक अ‍ॅण्ड ड्रॉप सेवा देणारा चालक जगदीश मौर्या (राहणार बनारस, उत्तर प्रदेश) हा नाशिक शहरातील द्वारका परिसरात कंपनीचे कर्मचाºयांना सोडून परत येत असताना पाथर्डी फाटा परिसरातून इगतपुरी येथे जाण्यासाठी प्रवासी म्हणून बसलेल्या चार ते पाच इसमांनी सदर स्वीप्ट कार गोंदे एमआयडीसी चौफुली परिसरात जबरदस्तीने थांबवून चाकूने त्यास गंभीर दुखापत केली. यावेळी कार व रोख रकमेची जबरीने लूटमार करत चालकाचे हातपाय बांधून त्यास वणी -सापुतारा रस्त्यावरील पांडाणे शिवारात सोडून दिले होते. सदर घटना घडल्यानंतर १० जानेवारी रोजी गोंदे कंपनीचे चालक राजेंद्र खताळे (रा. वैतरणा, ता. इगतपुरी) यांचेकडील स्कॉर्पिओ कार लुटून नेली आणि वणी-सापुतारा रस्त्यावर खताळे यांना सोडून दिले.
या दोन्ही गुन्ह्याचे साम्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी तत्काळ दखल घेत अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व पथकाने गस्त व चेक पॉइंटच्या माध्यमातून चौकशी केली. संदीप उर्फबबल्या अभिमन बनगर (२३) रा. कंकराळे, मालेगाव हल्ली रा. चुंचाळे शिवार नाशिक, समाधान रमेश वाघ (१९) रा. कंकराळे मालेगाव हल्ली कुमावतनगर पेठरोड नाशिक, उमेश नामदेव मासुळे (२४), अरुण विठोबा सूर्यवंशी (२०), भूषण विठोबा खेमनार (२० तिघे, रा. कंकराळे मालेगाव) यांची चौकशी केली. सदर गुन्हा करतेवेळी अनिल पाटील (रा. गौताणे, जिल्हा धुळे) हादेखील त्यांचे समवेत असल्याची माहिती पुढे आली. संदीप बनगर, समाधान वाघ, अनिल पाटील हे अंबड एमआयडीसी परिसरातील जेबीएफ व साईकृपा कंपनीत काम करत असून, विविध कंपन्याहमधील वाहनांचे कामकाजाबद्दल त्यांना माहिती होती. त्यांनी योजना आखून पिक अ‍ॅण्ड ड्रॉप करणारे वाहन लुटायचे व विक्र ी करून आपसात पैसे वाटून घ्यायचे अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत होती. पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असून, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी जाहीर केले आहे.सिनेस्टाइल पाठलागसदर गुन्ह्याताील स्कॉर्पिओ गाडी (क्रमांक एमएच १५ इएक्स ८०६३) ही मालेगाव शहरात काही संशयित घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून पाचही संशयितांना गाडीसह पकडले.

Web Title: Junky's gang robbery gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.