नांदगांव मांडवड रस्त्याला फक्त सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 06:21 PM2019-06-20T18:21:15+5:302019-06-20T18:22:32+5:30
मांडवड : नांदगांव मांडवड रस्ता हा दुरुस्त करण्याऐवजी केवळ वर वर डागडुजी करीत तेथे नविन फलक लावून ग्रामस्थ व वाहनचालकांची फसवणूक तर करीत नाही ना ? की केवळ एवढ्याच कामाचे कंत्राट देण्यात आले होते. या विषयावर सद्या गावात चर्चा होवू लागली असून त्याचा संबंधित विभागाने ग्रामस्थांना खुलासा करावा अशी मागणी केली जात आहे.

नांदगांव मांडवड रस्ता हा लोहशिंगवे, भालुर, लक्ष्मीनगर आणि मांडवड या गावांना, तालुक्याला जोडण्यासाठी अत्यंत महत्वाचा असुन सदर गावांच दळणवळण याच रस्त्याने होत आहे. सदर रस्ता हा पाठखाना ते नांदगांव दरम्यान अत्यंत खराब अवस्थेत आहे, मात्र संबधित विभागाने रस्त्यावरील खड्डे किंवा त्याचे काम करायचे सोडुन रस्त्याच्या बाजूचे सुशोभिकरण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यात रस्त्याच्या बाजुला गावांचा फलक लावणे, किलोमिटरचे नंबर लावणे व अत्यंत महत्वाचे आणि नागरिकांच्या शंका निर्माण करणारे काम म्हणजेच रस्त्यावरील ज्या जुन्या माऱ्या आहेत त्याच्या भितींना फक्त सिमेंटचा नविन लेप लावला आहे. याचे कारण मात्र समजलेले नाही. हिच शंका नागरिकांना सतावत असुन नेमक सबंधित विभागाला हे जूनेच काम नविन तर दाखवायचे नाही ना? अश्या अनेक प्रश्नांची सरबती ऐकायला मिळत आहे. जर रस्ता ईतका खराब अवस्थेत असतांना या विभागाला रस्ता सुधारण्याचे सोडुन सुशोभिकरण करावसे का वाटले याचा तपास वरिष्ठांनी घ्यावा अशी मागणी सदर गावातील नागरिकांकडुन होत आहे.