अवघ्या काही तासांत महामार्ग बसस्थानक लख्ख
By admin | Published: February 20, 2015 01:43 AM2015-02-20T01:43:49+5:302015-02-20T01:44:13+5:30
अवघ्या काही तासांत महामार्ग बसस्थानक लख्ख
सातपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ आणि सुंदर नाशिकचा संदेश देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झाडू हाती घेतले आणि अवघ्या काही तासांत महामार्ग बसस्थानक लख्ख झाले. बॉश कारखान्याच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
बॉश कंपनीच्या वतीने नव्या वर्षाच्या प्रारंभापासून शहराच्या विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यातच
सध्या स्वाइन फ्लूचा प्रसार वाढल्याने रोगराईचे वातावरण निर्माण झाले असल्याने त्यापार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक महत्त्वाची
असल्याचे सांगण्यात आले. बॉशचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि बॉश व्होकेशनल सेंटरच्या ५० प्रशिक्षणार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेच्या वेळी कंपनीचे उपाध्यक्ष सुधीर येवलेकर, मनुष्यबळ विकास विभागाचे महाव्यवस्थापक मोहन पाटील, ट्रेनिंग सेंटरचे एस. एस. नेगी, अनंत दांडेकर, रविकांत शार्दुल, सायली कडभाने उपस्थित होते. मोहन पाटील यांनी संवाद साधताना स्वच्छतेचे आवाहन केले. यावेळी आगारप्रमुख पूनम अहिरे, नियंत्रक सोनवणे यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले.