बसस्थानक झाले बोलके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:17 PM2020-01-29T22:17:05+5:302020-01-30T00:15:49+5:30
बसस्थाकातील माइक आणि स्पीकर दुरुस्त होताच चौकशी कक्षातून होणाऱ्या सूचनांमुळे प्रवाशांची गैरसोय थांबली आहे. मुके झालेले बसस्थानक पुन्हा बोलके झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
पिंपळगाव बसवंत : येथील बसस्थाकातील माइक आणि स्पीकर दुरुस्त होताच चौकशी कक्षातून होणाऱ्या सूचनांमुळे प्रवाशांची गैरसोय थांबली आहे. मुके झालेले बसस्थानक पुन्हा बोलके झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच राज्य परिवहन मंडळास जाग आली असून, इलेक्ट्रॉनिक यंत्रांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
जुन्या अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर पिंपळगाव आगारचा कारभार हाती घेणाºया आगारप्रमुख विजय निकम यांना त्यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी तातडीने दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद आगारप्रमुखांच्या कार्यवाहीमुळे सिद्ध झाले असून, स्थानकात अद्ययावत सुविधा मिळण्याची अपेक्षा यानिमित्ताने वाढली आहे. स्थानकाच्या चौकशी कक्षातील स्पीकर आणि माइक बंद पडल्याने प्रवाशांचा गोंधळ होत होता. गाडी कोणती आली आणि कोणत्या फलाटावर लागली किंवा कोणती गाडी केव्हा येणार आहे, याची माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. अनेकांना गाडी येऊन निघून गेल्यानंतर आपली गाडी चुकल्याचे कटू अनुभवही आले होते. त्यामुळे प्रवाशांनी येथील प्रशासन व कर्मचाºयांवर नाराजी व्यक्त केली होती. अनेकदा प्रवासी व कर्मचाºयांमध्ये वादही होत होते, मात्र नव्याने दाखल झालेल्या आगारप्रमुखांनी तत्काळ कार्यवाही केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
तीन महिन्यांपासून माइक व स्पीकर बंद होता. संबंधित कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत होते. यामुळे प्रवासी संतप्त होत होते. अनेकांना आपली गाडी कधी येते व कोणत्या फलाटावर लागते हे कळतच नव्हते, तर चौकशी कक्षातील कर्मचारी मनमानी करीत होते. मात्र नव्याने कारभार हाती घेणाºया आगारप्रमुख विजय निकम यांनी तातडीने माइक दुरु स्ती केला व गैरसोय थांबविली आहे. ‘लोकमत’ने हा प्रश्न मांडल्यानेच परिणाम दिसून आला आहे. ‘लोकमत’चे आभार.
- मयूर गावडे, सामाजिक कार्यकर्ता
आगाराचा कारभार हाती घेतल्यावर येथील समस्या अगोदर जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रवाशांना सेवा देण्यात स्थानक प्रशासन कटिबद्ध राहील. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. कामचुकार कर्मचाºयांवरही वचक ठेवत कारवाई करण्यात येईल.
- विजय निकम, आगारप्रमुख