पावसाचे निमित्तच; इतर वेळीही लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:00 AM2020-10-03T00:00:05+5:302020-10-03T01:00:26+5:30
नाशिक: पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या पुर्वानुभवानुसार नाशिककरांनी शुक्रवारी झालेल्या पावसातही वीजेचा लपंडाव अनुभवला. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे मान्य केले तरी इतर दिवशीही सातत्याने विस्कळीत वीजपुरवठा नित्याचीच बाब झाली आहे.
नाशिक: पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या पुर्वानुभवानुसार नाशिककरांनी शुक्रवारी झालेल्या पावसातही वीजेचा लपंडाव अनुभवला. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे मान्य केले तरी इतर दिवशीही सातत्याने विस्कळीत वीजपुरवठा नित्याचीच बाब झाली आहे.
शुक्रवारी दुपारनंतर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला झाला तर काही भागात वीजेचा लपंडाव सुरू होता. सायंकाळनंतर दाटून आलेला काळोख आणि वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागातील वीज काहीवेळ बंद होती. कमी अधिक प्रमाणात नाशिककरांना खंडीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला असला तरी इतर दिवशीही वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषता: महात्मानगर,सिडकोतील काही भाग, अंबड आणि इंदिरानगर परिसरातील नागरिकांना नेहमीच विस्कळीत वीजेला सामोरे जावे लागते.
केवळ याच भागात नव्हे तर शहरातील अन्य भागातील नागरिकांना देखील असाच अनुभव येत आहे. उपनगर परिसरात तर मध्यरात्री केंव्हाही वीजपुरवठा गायब होतो. काही फेज बंद तर कही सुरू राहत असल्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली तर काम सुरू असल्याचे किंवा थोड्यावेळेत वीज येईल अशी उत्तरे मिळतात. परंतु कुठे बिघाड झाला आणि नेमके काय घडले याबाबत माहितीच दिली जात नाही.
सिडको-अंबड परीसर तसेच सातपूरच्या काही भागालाही हीच समस्या भेडसावत आहे. पंचवटीतील हिरावाडी परिसर, दिंडोरी रोड परिसरातीही खंडीत वीजपुरवठ्याचा नागरिकांना अनुभव येत आहे. पावसाळा परतीच्या मार्गावर असतांनाही शुक्रवारी झालेल्या पावसात नागरिकांना पावसाळ्यातील खंडीत वीजपुरवठ्याचा अनुभव आला.
नागरिकांशी तुटला संपर्क
वीजबील भरणा,मीटर रिडींग तसेच तक्रारी करण्याºया यंत्रणेचे खासगीकरण झाल्याने नागरिकांचा आणि स्थानिक अभियंत्यांचा फारसा संपर्क राहिला नाही. लाईनमनचा क्रमांक नागरिकांकडे सापडतोही परंतु अधिकारी आणि अभियंत्यांचा भ्रमणध्वनी मिळविण्यासाठी धडपड करावी लागते.