देयक काढण्यासाठी अवघे दोनच संगणक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:37 AM2018-08-23T00:37:02+5:302018-08-23T00:38:04+5:30
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीबिलासाठी १८ लिपिकांसाठी केवळ तीनच संगणक असून, यातील एक संगणक नादुरुस्त आहे, तर प्रिंटरदेखील फक्त एकच आहे.
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीबिलासाठी १८ लिपिकांसाठी केवळ तीनच संगणक असून, यातील एक संगणक नादुरुस्त आहे, तर प्रिंटरदेखील फक्त एकच आहे. संपूर्ण सिडको विभागातील सुमारे पंचेचाळीस हजार पाणीबिले काढण्यासाठी प्रत्येक लिपिकास संगणक व प्रिंटर देणे गरजेचे असताना सदरचे कामकाज हे अवघ्या दोन संगणक व एका प्रिंटरवर सुरू असल्याने कर्मचाºयांना काम करताना उशीर होत असून, कर्मचाºयांना यासाठी रात्रीचे १० वाजेपर्यंत काम करावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व महापालिका कर्मचारी व अधिकाºयांनी कामकाजाची धास्ती घेतली असली तरी आयुक्तांच्या आदेशानुसार कामकाज सुरू आहे. पूर्वी मनपाच्या वतीने दर सहा महिन्यांनी पाणीबिल नागरिकांना दिली जात होती, परंतु आयुक्तांनी यात बदल करून आत पाणीबिले हे दर चार महिन्यांनी काढण्याचे आदेश दिले आहेत. सिडकोतील सुमारे ४५ घरधारकांना पाणीबिले देण्यासाठी मनपाच्या सिडको पाणीपुरवठा विभागात अठरा कर्मचारी काम करीत आहे. यातील प्रत्येक लिपिकास सुमारे तीन ते चार हजार पाणीबिलांची वाटप करावी लागते. पाणीबिलांचे वाटप वेळेवर होण्यासाठी १८ लिपिकांना स्वतंत्र संगणक व प्रिंटर असणे गरजेचे असताना हे कामकाज केवळ दोन संगणक व एका प्रिंटरवर सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ४५ हजार पाणीबिले प्रथम संगणकामध्ये फिड करणे व यानंतर प्रत्येक पाणीबिलाची प्रिंट काढणे यासाठी संगणक व प्रिंटरची संख्या अधिक असणे गरजेचे असताना ते कामकाज दोन संगणक व एका प्रिंटरच्या सहाय्याने सुरू आहे. नागरिकांना वेळेत पाणीबिल पोहचले पाहिजे हे अधिकाºयांचे आदेश असल्याने पाणीबिले काढण्यासाठी प्रत्येक लिपिकाजी धावपळ सुरू असते. एकूणच सुधारित व निटनेटके काम करण्यासाठी कर्मचाºयांची तयारी असली तरी त्यासाठी पुरेसे यंत्रसामुग्रीच जर मनपाकडून दिली जात नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
कर्मचा-यांची दमछाक
मनपाच्या सिडको पाणीपुरवठा विभागात कामकाज करणाºया कर्मचाºयांना पाणीबिले काढण्यासाठी संगणक व प्रिंटरची कमतरता असल्याने कर्मचाºयांची कामकाज करताना चांगलीच दमछाक होत आहे. संगणक व प्रिंटरची संख्या कमी असल्याने कर्मचाºयांना रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम करावे लागत असून, यासाठी मात्र कामाचा मोबदलादेखील मिळत नाही.